Nanded Crime: संशयाने मैत्री संपवली! आधी चाकूने वार, मग दगडाने ठेचलं; नांदेडमध्ये मित्रानेच काढला काटा, धक्कादायक कारण समोर

Naigaon Crime Update | गडगा–कौठा रोडवर आढळले १७ वर्षीय तरुणाचा मृतदेह
Friend kills friend Naigaon
जिशान लतीफ सय्यद याचा गावातील अब्बास रमजानसाब शेखने खून केला. (Pudhari Photo)
Published on
Updated on

Friend kills friend Naigaon

नायगाव : “माझ्या बायकोकडे तू वाईट नजरेने पाहतोस” या संशयावरून मित्रानेच मित्राचा खून करून मृतदेह गडगा–कौठा रोडवर टाकल्याची थरकाप उडवणारी घटना उघडकीस आली आहे. १७ वर्षीय जिशान लतीफ सय्यद याचा त्याच गावातील अब्बास रमजानसाब शेखने खून केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, डोंगरगाव गावात काही महिन्यांपूर्वी मोहरमच्या दिवशी किरकोळ वाद झाला होता. “तेव्हा दोघांमध्ये बरीच झटापट झाली होती. पण मोठ्यांनी मध्यस्थी करून भांडण मिटवले. ‘वाईट नजर’ टाकल्याचा संशय आब्बास सतत बोलायचा. नंतर मात्र दोघे परत एकत्र दिसू लागले. दरम्यान, १ ऑक्टोबरच्या संध्याकाळी जिशान नमाज अदा करून बाहेर पडला. काही वेळातच तो आब्बाससोबत मोटारसायकलवरून गावाबाहेर गेला.

Friend kills friend Naigaon
Marathwada Flood | नांदेड, गंगाखेडसह १९८ गावांसाठी पुढील २० तास धोक्याचे: जायकवाडीचा विसर्ग आज रात्रीपर्यंत पोहचणार

घरच्यांनी वारंवार फोन केले असता सुरुवातीला “मी पेट्रोल आणायला गेलो आहे” असे सांगितले. त्यानंतर मात्र फोन उचललाच नाही. रात्र उलटली, पण जिशान घरी परतला नाही. वडिलांनी काळजाने त्रस्त होऊन आब्बासला फोन केला तेव्हा त्याचे उत्तर होते, “मला काही माहिती नाही.”

२ ऑक्टोबर रोजी सकाळी मुखेड पोलिसांकडून नायगाव तालुक्यातील गडग्याजवळ एका अज्ञाताचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. मृतदेहाचे फोटो दाखवले असता कुटुंबीयांना धक्का बसला.

Friend kills friend Naigaon
Nanded Zilla Parishad : नांदेड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव

डोक्यावर दगडाने वार, छातीत चाकूचे घाव, कपडे व पोटाचा काही भाग जळालेला अशा अवस्थेत मृतदेह आढळून आला. या प्रकरणी नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. संशयातून सुरू झालेला वाद अखेर खुनात परिवर्तित झाला. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील तपास सुरू आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news