Naigaon Crime | नायगावात दारूच्या नशेत मुलाकडून जन्मदात्या बापाचा खून

नायगाव पोलिसांनी संशयिताला अटक करून गुन्हा दाखल
  Crime  News
Crime NewsPudhari file photo
Published on
Updated on

Naigaon Son Kills Father

नायगाव : नायगाव शहरात मानवतेला काळिमा फासणारी, मन सुन्न करणारी घटना घडली आहे. पानसरे नगर परिसरात मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकाराने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तुकाराम गटलावार (वय ६५, सध्या रा. पानसरे नगर, नायगाव, मूळ रा. कौठा ता. कंधार) व त्यांचा मुलगा नामदेव तुकाराम गटलावार (वय ३५) हे काही दिवसांपूर्वी उदरनिर्वाहासाठी नायगाव येथे वास्तव्यास आले होते. तुकाराम हे मानसिकदृष्ट्या काहीसे अस्थिर असल्याचे सांगितले जाते, तर नामदेव हा स्थानिक कापड दुकानात मुनीम म्हणून काम करत होता.

  Crime  News
Nanded news | धर्माबाद पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यांवर 'मास रेड'; दोन गुन्हे दाखल, मुद्देमाल जप्त

मात्र, नामदेवला दारूचे तीव्र व्यसन जडले होते. त्याच्या व्यसनाधीनतेमुळे घरात सतत वाद-विवाद होत असत. या परिस्थितीला कंटाळून त्याची पत्नी माहेरी निघून गेल्याची माहिती आहे. वडील आणि मुलामधील तणाव दिवसेंदिवस वाढतच होता. बुधवारी रात्री पुन्हा बाप-लेकात जोरदार वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की संतापाच्या भरात नामदेवने वडील तुकाराम यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तुकाराम यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती गुरुवारी सकाळी मिळताच नायगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी नामदेवला अटक केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. मात्र, मुलानेच खून केल्याने मृतदेह ताब्यात कोण घेणार, हा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.

  Crime  News
Nanded news | किनवट बाजार समितीचा कारभार चव्हाट्यावर; सोयाबीनचे चुकारे थकल्याने गोदामाला ठोकले सील

या प्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल सांगवीकर यांनी घटनेला दुजोरा देत आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याचे सांगितले, मात्र अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलीस निरीक्षक मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

पानसरे नगरसह संपूर्ण नायगाव परिसरात भीती, संताप आणि हळहळ

ज्या बापाने जन्म दिला, त्याच बापाचा जीव घेण्याइतकी माणसाची संवेदना बोथट झाली आहे का? दारूच्या व्यसनाने विवेक हरपून माणूस किती क्रूर होऊ शकतो, याचे हे भयावह उदाहरण ठरत आहे. या घटनेमुळे पानसरे नगरसह संपूर्ण नायगाव परिसरात भीती, संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news