

Nanded Municipal Council elections
विशेष प्रतिनिधी
नांदेड : भाजपाचे जिल्हा प्रभारी खा. अशोक चव्हाण यांनी आपल्या प्रभावक्षेत्रातील दोन नगर परिषदांशिवाय लोहा-कंधार पालिका तसेच हिमायतनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत लक्ष केंद्रित केले असल्याचे दिसत असून पक्षाचे तीन आमदार आपल्या कार्यक्षेत्रातील निवडणुका एकहाती सांभाळत आहेत. त्यांच्याकडे पक्षाचा एकही नेता फिरकला नसल्यामुळे ते एकाकी पडल्याचे दिसत आहे.
नगरपालिकांची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आलेली असताना मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची जाहीर सभा गुरुवारी लोहा येथे झाली. मंत्री पंकजा मुंडे यांनाही या सभेसाठी पाचारण केले गेले. मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी लोहा पालिकेचीच निवड का करण्यात आली, ते कोणी स्पष्ट केले नसले, तरी त्यामागचा भाजपाच्या स्थानिक नेत्यांचा राजकीय हेतू साध्य झाला नाही. केवळ अशोक चव्हाणांचेच नव्हे तर जिल्ह्यातील भाजपाचे विरोधक झालेले प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी टीकाटिप्पणी केली नाही.
वरील सभेत खा. अशोक चव्हाण यांनी चिखलीकर यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला, तरी त्यांनी मांडलेल्या एकाही मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. चिखलीकरांच्या कन्या भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष आहेत; पण स्थानिक संयोजकांनी त्यांना या सभेसाठी पाचारण केले नव्हते.
आहे, तर आ. तुषार राठोड यांना मुखेडमध्ये एकाकी पाडण्यात आल्याचे दिसत आहे. भाजपाने जिल्ह्यात १३ पैकी ११ ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार उभे केले असून त्यांतील धर्माबाद, देगलूर, उमरी, कुंडलवाडी इत्यादी नगरपालिकांत भाजपाची लढत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरुद्ध होत असली, तरी आतापर्यंत तेथे एकही मोठी सभा भाजपाला घेता आली नाही. आ. राजेश पवार यांची कोंडी करण्याचा प्रयत्न पक्षातूनच झाला आ. जीतेश अंतापूरकर यांच्या मतदारसंघात ३ ठिकाणी निवडणूक होत आहे. त्यांतील बिलोलीमध्ये भाजपामध्ये स्थानिक नेत्यांनी वादग्रस्त माजी नगराध्यक्षाच्या मराठवाडा जनहित पार्टी (मजपा) ला साह्यभूत ठरेल, अशी भूमिका घेतली. याच पार्टनि धर्माबादमध्ये भाजपालाच आव्हान दिले. त्यामुळे आ. पवार अडचणीत आले, तरी तेथे भाजपाचा एकही संकटमोचक गेला नाही. देगलूरमध्ये भाजपा निवडणुकीत आहे; पण तेथेही कोणी गंभीरपणे लक्ष घातले नाही. स्थानिक आमदार तेथे एकाकी पडला आहे.
सबंध जिल्ह्यात भाजपाने केवळ भोकर आणि मुदखेडमध्ये मोठी फौज तैनात केली असल्याचे दिसत आहे. भोकरमध्ये भाजपाला दोन्ही मित्रपक्षांनी आव्हान दिले असून भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची अवस्था बिकट झाल्याचे सांगितले जात आहे.
पक्षाचे खासदार अजित गोपछडे लोहा येथील जाहीर सभेला व्यासपीठावर हजर होते; पण नगरपालिका निवडणुकीत त्यांच्यावर कोणती जबाबदारी सोपविण्यात आली, ते समोर आलेले नाही. नांदेड महानगरातील प्रमुख कार्यकर्त्यांना महत्त्व दिले गेले नाही. माजी आमदारा राम पाटील रातोळीकर यांना हदगावची जबाबदारी सांभाळा, असे कळविले गेले; पण तेथे नगराध्यक्षपदासाठी भाजपाचा उमेदवारच नाही. रातोळीकरांसह अनेक प्रमुख कार्यकर्ते अलिप्त असल्याचे दिसत आहे.