MP Ravindra Chavan : ...तर न्यायालयात जाणार

खा. रवींद्र चव्हाण ः विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेस आक्रमक
Opposition leader dispute Nanded
MP Ravindra ChavanFile Photo
Published on
Updated on

नांदेड ः नांदेड महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते पदाचा काँग्रेस-वंचित आघाडीचा दावा योग्य आणि नियमात बसणारा आहे. आघाडीचे 15 नगरसेवक असल्यामुळे या पदावर आमचा हक्क आहे. तरीही जाणीवपूर्वक हे पद आघाडीला न दिल्यास न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नाही,अशी आक्रमक भूमिका खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी घेतली आहे.

शनिवारी काँग्रेस पक्ष कार्यालयात आयोजित वार्ताहर बैठकीत ते बोलत होते. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची निवडणूकपूर्व युती असून महापालिका निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्रित लढविली आहे. आघाडीने नांदेड लोक न्याय आघाडी स्थापन करून विभागीय आयुक्तांकडे नोंदणी केलेली आहे. आघाडीचे गटनेते प्रशांत इंगोले यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा प्रस्ताव 10 फब्रुवारी रोजीच महापौरांकडे सादर केल्याची माहिती चव्हाण यांनी यावेळी दिली.

Opposition leader dispute Nanded
Nipani News: आयफोनच्या हट्टापायी दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवले

नियमानुसार विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस-वंचितचा दावा योग्य आहे. हे पद आघाडीला न मिळाल्यास न्यायालयात जावे लागेल. न्यायालय आम्हाला निश्चित न्याय देईल, असा विश्वास खा.चव्हाण यांनी व्यक्त केला. नांदेड महानगरपालिका महापौर, उपमहापौरपदाच्या निवडीनंतर आता विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीचे वेध लागले आहेत.

Opposition leader dispute Nanded
Charni Road Girgaon Bridge: सैफी हॉस्पिटलविरोधात स्थानिकांचे आंदोलन

काँग्रेस-वंचित आघाडी आणि एमआयएम या दोघांमध्ये चुरस सुरू झाली आहे. एमआयएमकडे 14 तर काँग्रेस-वंचितकडे 15 नगरसेवक आहेत. विरोधी पक्षनेतेपदावर एमआयएमने माजी उपमहापौर मसूद खान यांचे नाव पुढे केले असून काँग्रेस-वंचित आघाडीने माजी उपमहापौर अब्दुल गफार यांच्या नावाचाचा प्रस्ताव महापौर कविता मुळे यांच्याकडे पाठविला आहे.

चौकटीत राहूनच महापौर निर्णय

विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीचे सर्वाधिकार महापौरांकडे असले तरी एमआयएम की काँग्रेस-वंचित आघाडी या चर्चेने जोर धरला आहे. खा.रवींद्र चव्हाण यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिल्यामुळे विरोधी पक्षनेते पदाची निवड करताना कायद्याच्या चौकटीत राहूनच महापौर निर्णय घेतील, असे दिसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news