

Agricultural Exhibition Farmers turn their backs on agricultural exhibitions
श्रीक्षेत्र माहूर, पुढारी वृत्तसेवा : श्रीदत्त जयंती उत्सवानिमित्त पंचायत समितीच्या कृषी विभागाने दि. ४ डिसेंबर रोजी घेतलेल्या कृषी प्रदर्शनाकडे शेतकऱ्यांनी पूर्णतः पाठ फिरविल्याने विजेत्यांची नावे व बक्षीसांचे वितरणाची प्रक्रिया केवळ कागदोपत्रीच करण्याची पाळी त्या विभागावर आली आहे.
शेतकऱ्यांविना घेण्यात आलेल्या उपस्थित कृषी प्रदर्शनात अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी मद्यधुंद अवस्थेत होते, अशी जोरदार चर्चा आहे. त्यात तथ्य असल्यास गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस त्या अधिकाऱ्याचा निलंबनाचा प्रस्ताव पाठवितात की, त्यांना पाठीशी घालतात याचीच सर्वत्र चर्चा सुरु आहे.
श्रीदत्त जयंती उत्सव या मंगल पर्वावर आयोजित कृषी प्रदर्शनात पूर्वी आमदार, पदाधिकारी, विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येत सहभाग घेत असे. त्याचवेळी मान्यवरांच्या हस्ते प्रथम, द्वितीय, तृतीय व प्रोत्साहनपर बक्षीसांचे वितरण होत असे. यावर्षी मात्र बक्षीसांची तुटपुंजी रक्कम, जनजागृतीचा अभाव व सक्तीच्या अटीशर्ती लागू केल्याने फळ, भाजीपाला व कृषी माल उत्पादक शेतकऱ्यांनी या प्रदर्शनात भाग घेण्याचेच टाळले.