Nanded ATM card swap fraud arrest- एटीएममधून आले नाहीत पैसे, क्षणात कार्ड बदलून २८ हजार लंपास; आंतरराज्यीय सराईत आरोपीला अटक

एटीएममधून आले नाहीत पैसे, क्षणात एटीएम कार्ड बदलून २८ हजार लंपास; आंतरराज्यीय सराईत आरोपीला अटक, उमरखेड डीबी पथकाची मुंबई येथे कारवाई
उमरखेड डीबी पथकाने कारवाई करत आरोपीला मुंबईतून अटक केली
उमरखेड डीबी पथकाने कारवाई करत आरोपीला मुंबईतून अटक केली Pudhari photo
Published on
Updated on

उमरखेड : एटीएममधून पैसे काढण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम कार्ड बदलून खात्यातील रक्कम लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय सराईत आरोपीस उमरखेड पोलिसांच्या डीबी पथकाने मुंबई येथून ताब्यात घेतले. आरोपीकडून गुन्ह्यात लुबाडलेली २८ हजार रुपयांची संपूर्ण रोख रक्कम जप्त करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला.

दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.११ वाजता मोहननगर, उमरखेड येथील रहिवासी साईनाथ शेषराव शिंदे (वय ५०) हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. एटीएममधून पैसे निघत नसल्याने त्यांच्या मागे उभ्या असलेल्या एकाने मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडील एटीएम कार्ड घेतले. त्याऐवजी दुसरे एटीएम कार्ड शिंदे यांना देऊन त्यांना पासवर्ड टाकण्यास सांगितले. त्यानंतर संबंधित आरोपी शिंदे यांचे मूळ एटीएम कार्ड घेऊन तेथून निघून गेला.

काही वेळाने शिंदे यांच्या बँक खात्यातून तीन व्यवहारांद्वारे एकूण २८ हजार रुपये काढण्यात आले. त्यामुळे त्यांच्या खात्यातील शिल्लक रक्कम संपली. याप्रकरणी उमरखेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. गुन्ह्याचा तपास करताना पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे आणि डीबी पथकाने एटीएम परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीची ओळख पटविण्यात आली.

आरोपी सय्यद कमालउद्दीन खान (वय ३६, मूळ रा. सगरा सुंदरपूर, कालगंज, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश) हा सध्या मुंबईतील यादव मिश्रालाल चाळ, यादवनगर, खैरानी रोड, साकीनाका, अंधेरी (पश्चिम) येथे राहत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथकाने मुंबई गाठून आरोपीच्या राहत्या ठिकाणी शोध घेतला. यावेळी त्याच्याकडून एटीएम कार्ड बदलून फसवणुकीने मिळवलेली २८ हजार रुपयांची संपूर्ण रोख रक्कम जप्त करण्यात आली. आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

उमरखेड डीबी पथकाने कारवाई करत आरोपीला मुंबईतून अटक केली
Illegal sand mining : नांदेड ग्रामीण पोलिसांची गोदावरी पात्रात कारवाई

या कारवाईमुळे एटीएम कार्ड बदलून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीच्या कारवायांना आळा घालण्यास मदत होणार असून, उमरखेड डीबी पथकाच्या तपास कौशल्याचे कौतुक होत आहे.

उमरखेड डीबी पथकाने कारवाई करत आरोपीला मुंबईतून अटक केली
Illegal sand mining : नांदेड ग्रामीण पोलिसांची गोदावरी पात्रात कारवाई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news