Nanded|शेतात काम करताना सर्पदंश; मुगाव येथील शेतकऱ्याचा मृत्यू

Nanded | शेतात काम करताना सर्पदंश; मुगाव येथील शेतकऱ्याचा मृत्यू, ६४ वर्षीय भीमराव बनसोडे यांचा दुर्दैवी अंत
Snake Bite
Snake BitePudhari
Published on: 
Updated on: 

नायगाव:मुगाव येथील ६४ वर्षीय शेतकरी भीमराव मानिका बनसोडे यांचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने बनसोडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात हळहळ व्यक्त होत आहे.

रविवार, ४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बनसोडे शेतात काम करीत होते. यावेळी अचानक त्यांना सापाने दंश केला. सर्पदंश झाल्याचे समजताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने नायगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Snake Bite
Nanded | एकाच रात्री तीन चोऱ्या; पहाटेच्या अंधारात लाखोंचा ऐवज लंपास

घटनेची माहिती मिळताच ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उच्चस्तरीय तपासणी करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. सोमवारी (५ ऑक्टोबर) सकाळी १० वाजता मुगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आप्तस्वकीय, मित्रपरिवार, शेतकरी तसेच लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Snake Bite
Nanded News : १९ वर्षीय विद्यार्थिनीवर धारदार शस्त्राने हल्ला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news