नांदेड : मराठा आंदोलन पेटले; आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या वाहनाची तोडफोड

आमदार मोहरराव हंबर्डे
आमदार मोहरराव हंबर्डे

नवीन नांदेड ; पुढारी वृत्‍तसेवा काल (शुक्रवार) रोजी रात्री उशिरा नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे हे पिंपळगाव निमजी (ता. जि. नांदेड) येथे कीर्तन कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी वाहनावर दगडफेक करून काचा फोडल्याची घटना घडली. या हल्ल्यात आमदार मोहनराव हंबर्डे बचावले, मात्र त्यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

सप्ताहाच्या कीर्तनासाठी आ. हंबर्डे हे पिंपळगाव निमजी येथे आले होते. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गावात प्रवेश बंदी असल्याची सूचना देऊन आमदारांना गावात येण्यास मनाई केली होती. मात्र, आमदारांनी हट्ट धरल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी आमदार यांच्या वाहनावर दगडफेक केली. अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात आमदार हंबर्डे बचावले, मात्र त्यांच्या वाहनाचे नुकसान झाले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news