Nanded Crime : विसर्जन मिरवणुकीत गुलाल उधळण्यावरून वाद

तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; १४ जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

​नांदेड: गणपती विसर्जन मिरवणुकीत गुलाल उधळण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका १९ वर्षीय तरुणाला लोखंडी रॉड आणि काठीने डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. हदगाव तालुक्यातील मनुला बुद्रुक येथे संतोष जाधव यांच्या घरासमोर २६ सप्टेंबर रोजी पहाटे २.३० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.

या प्रकरणी हदगाव पोलीस ठाण्यात १४ जणांविरुद्ध गंभीर दुखापत आणि बेकायदेशीर मंडळी जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशुतोष दीपक जाधव (वय १९, रा. मनुला बु., ता. हदगाव) या तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

Crime News
Chhatrapati Sambhajinagar Crime : ‘त्या’ बाळाची साडेतीन लाखात हैदराबादला विक्री

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपती विसर्जन मिरवणुकीत गुलाल उधळण्याच्या कारणावरून आरोपींनी बेकायदेशीर मंडळी जमवून आशुतोष याच्याशी वाद घातला. या वादातून आरोपी सोनबाराव जाधव, प्रताप नारायन पवार, गणेश विठ्ठल पवार, सुनील उर्फ सुग्रीव दादाराव जाधव, जीवन सोनबा जाधव, अंकुश किशन पवार, ऋषिकेश मारुती जाधव, विकास सोनबा जाधव, अरविंद अनंता जाधव, ऋषिकेश शिवाजी जाधव, शुभम उर्फ किल्या गजानन पवार, विकास पुंडलीक पवार, श्रीकांत यशवंतराव शिंदे आणि इतर साथीदारांनी आशुतोषला लोखंडी रॉड व काठीने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. तसेच त्याच्या पोटावर व अंगावर बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.

Crime News
Jalna illegal sand mining : जरांगेंच्या कोअर कमिटीतील कटारे यास लावलेला ४ कोटी ९० लाखांचा दंड कायम

या घटनेनंतर जखमी आशुतोष जाधव याच्या फिर्यादीवरून हदगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ११८(२), ११८(१), ११५(२), ३५१(३), १८९(४), १९०, १९१(२), १९१(३) आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news