

Sambhaji Nagar Three kg of silver seized in robbery case
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
बजाजनगर येथील दरोडाप्रकरणी गुन्हेश -ाखेच्या पथकाने सोमवारी (दि.९) सायंकाळी पडेगाव भागातून मृत अमोल खोतकर याच्या कारमधील दोन बॅगमध्ये ठेवलेली सुमारे तीस किलो ३४१ ग्रॅम चांदीची भांडी हस्तगत केली असून, ती कारही पोलिसांनी जप्त केली असल्याची माहिती गुन्हेशाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली. दरोडाप्रकरणी पोलिसांनी रविवारी रात्री अंबाजोगाई येथून आणखी एका आरोपीला अटक केली. सूर्यकांत ऊर्फ सुरेश श्रीरम मुळे (३९, रा. गांधीनगर, अंबाजोगाई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी मुळे याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस एस जाधव यांनी ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान मुळे याच्याकडे २० तोळे सोने दिले असल्याची कबुली अटकेत असलेल्या आरोपी सुरेश गंगणे याने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्ह्यात अमोल खोतकर याची बहीण रोहिणी खोतकर हिला चौकशीसाठी पोलिसांनी बोलावले होते. चौकशीदरम्यान तिने अमोलच्या गाडीबाबत माहिती दिली. एन्काउंटर होण्यापूर्वी अमोलने तिला सांगितले होते की, त्याच्या गाडीत दोन बंग असून, त्या महत्त्वाच्या आहेत. ही बाब चौकशीदरम्यान तिने पोलिसांना सांगितली.
त्यानुसार पोलिसांनी पडेगाव परिसरातील पटेल टॉवर जवळील एका गॅरेजमधून ती गाडी हस्तगत केली. विशेष म्हणजे ती कार गैरेज मधील दहा ते बारा भंगार वाहनांमध्ये लपविण्यात आली होती. गॅरेज मालकालाही ही कार कोणी लावली याची माहिती नव्हती. दरम्यान रोहिणीने दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शोखेने गरेजवर जाऊन गाडीची तपासणी केली. त्यावेळी गाडीच्या डिक्कीत दोन बॅगमध्ये ३० किलो ३४१ ग्रॅम चांदीची भांडी सापडल्याची माहिती निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली. त्यानुसार ती अलिशान कार आणि चांदीची भांडी पोलिसांनी हस्तगत केली आहे.
दरम्यान उद्योजक संतोष लड्नु यांच्या घरावर १५ मे च्या रात्री दरोडा पडला होता. या बहुचर्चित दरोडा प्रकरणाच्या तपासाला गती मिळाली आहे. चोरी गेलेल्या ३२ किलोंपैकी ३० किलो ३४१ ग्रॅम चांदीची भांडी हस्तगत करण्यात गुन्हेशाखेला यश आले असून, घटनेच्या २५ दिवसांतील ही मोठी कारवाई मानली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १६ आरोपींना अटक केली आहे.
तसेच सोमवारी गुन्हे शाखेच्या पथकाने आणखी एक आरोपी सुरेश मुळे याला अटक केली आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेला सुरेश गंगणे या आरोपीने मुळे याच्याकडे दरोड्यातील २० तोळे सोने दिले होते. ते विकून आर ोपी मुळे याने एक आलिशान चारचाकी विकत घेतल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यावरून पोलिसांनी आरोपी मुळे याला अटक करून न्यायालात हजर केले. त्याला न्यायालयाने १३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणात पोलिसांतर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड. सुधीर बनसोड यांनी बाजू माडली.
दरोडाप्रकरणी गुन्हेशाखेच्या पथकाने रविवारी अटक केलेला सुरेश मुळे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर शहरातील उस्मानपुरा, गंगाखेड, भीगवण, येरमाळा येथे प्रत्येकी एक तर लातूर येथे दोन आणि अंबाजोगाई पोलिस ठाण्यात १२ असे एकूण १८ दरोडा, जबरी चोरी, घरफोडी यासारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
मृत अमोल खोतकर याच्यानंतरचा मुख्य आर-सुरेश गंगणे याला कोंडीत पकडल्याने तो पोलिसांना माहिती देत आहे. त्याने दिलेल्या कबुलीवरून पोलिसांनी घटनेच्या २५ दिवसांत १७आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे आरोपी गंगणेच्या माहितीबरच पोलिसांची भिस्त असल्याचे दिसून येत आहे.