Nanded News : अवैध धंद्यांना दणका; महिनाभरात १,६०७ गुन्हे

नांदेड पोलिसांची २,५९६ जणांवर कारवाई; २१ कोटी २१ लाखांचा मुद्देमाल जप्त
Nanded News
Nanded News : अवैध धंद्यांना दणका; महिनाभरात १,६०७ गुन्हेfile photo
Published on: 
Updated on: 

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नांदेड पोलीस परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या चारही जिल्ह्यांत अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी सप्टेंबर महिन्यात धडक मोहीम राबवली. 'अवैध व्यवसाय निर्मूलन मोहीम-३' अंतर्गत १ ते ३० सप्टेंबरदरम्यान करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल १ हजार ६०७ गुन्हे दाखल करण्यात आले असून, २ हजार ५९६ जणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत २१ कोटी २१ लाख ८७ हजार ८२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिली.

विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली चारही जिल्ह्यांत गुटखा, मटका-जुगार, अवैध दारू विक्री तसेच बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात विशेष पथकांसह स्थानिक पोलिसांनी कारवाई केली. अवैध अवैध धंदे दारूविक्रीचे सर्वाधिक गुन्हेअवैध दारूविक्रीप्रकरणी सर्वाधिक ९७८ गुन्हे दाखल करण्यात आले.

यामध्ये १ हजार १६ आरोपींवर कारवाई करून ५२ लाख ४७ हजार १०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मटका व जुगारप्रकरणी २९७गुन्हे दाखल करून १ हजार १०७ आरोपींवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २ कोटी ५३ लाख ९४ हजार ९६ रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. गुटखा विक्रीविरोधात ३१ गुन्हे दाखल करण्यात आले.

यामध्ये ४८ आरोपींवर कारवाई करून १ कोटी ३५ लाख ५१ हजार ५५२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी ४३ गुन्हे दाखल झाले असून ६३ आरोपींकडून ६ लाख ५६ हजार ५४० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

विविध कायद्यांन्वये दाखल करण्यात आलेल्या २५८ गुन्ह्यांत ३६२ आरोपींवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल १६ कोटी ७३ लाख ३८ हजार ५३३ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. नांदेड पोलीस परिक्षेत्रातील स्थानिक पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा आणि विशेष पथकांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

१ ऑक्टोबरपासून पुन्हा मोहीम

४ सप्टेंबर महिन्यातील कारवाईनंतर आता पुन्हा १ ऑक्टोबरपासून 'अवैध व्यवसाय निर्मूलन मोहीम-४' सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत गुटखा, अवैध दारू, मटका-जुगार, अंमली पदार्थ, बेकायदेशीर वाळू उपसा व वाहतूक, वेश्या व्यवसाय तसेच अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news