Nanded Youth Drowned | विहिरीत बुडून कोठारी येथील तरुणाचा मृत्यू

विहिरीतील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे खोल पाण्यात बुडाला
  Nanded Kothari Youth Drowned
राहुल तोडसामPudhari
Published on
Updated on

Nanded Kothari Well Drowning Incident

मांडवी : शिवारातील एका शेतातील विहिरीवर गेलेल्या एका २२ वर्षीय तरुणाचा पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना कोठारी शिवारात शनिवारी (दि. 23) घडली. राहुल भारत तोडसाम (वय २२, रा. कोठारी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

राहुल तोडसाम हा तरुण सकाळी दहा वाजताच्या सुमारास कोठारी शिवारातील एका शेतातील विहिरीवर गेला होता. मात्र, विहिरीतील पाण्याचा अचूक अंदाज न आल्यामुळे तो खोल पाण्यात बुडाला. ही धक्कादायक घटना कोठारी, जमुनानगर आणि रामजी नाईक तांडा येथील नागरिकांना समजताच घटनास्थळावर गावकऱ्यांनी गर्दी केली.

  Nanded Kothari Youth Drowned
Nanded Crime News : अमृतसरच्या महिलेसह चौघांना बेड्या

घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) गंगाधर गायकवाड ,तलाठी रेड्डीवार, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मालाबाई कनाके, मनीष ठाकरे आणि पिसाळ यांच्यासह सर्व पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

विहिरीत पाण्याचा साठा जास्त असल्याने सुरुवातीला अडचणी येत होत्या. मात्र, जमुनानगर, रामजी नाईक तांडा आणि कोठारी येथील स्थानिक तरुणांनी जीवाची पर्वा न करता विहिरीत उड्या मारल्या आणि अथक परिश्रमानंतर राहुलचा मृतदेह विहिरीबाहेर काढला.

  Nanded Kothari Youth Drowned
Nanded News : फरारी आरोपीला हैदराबादमधून अटक

मृतदेह विहिरीबाहेर काढल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी आणि शवविच्छेदनासाठी मृतदेह मांडवी येथील शासकीय दवाखान्यात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे कोठारी आणि परिसर परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news