Nanded Crime | किनवट तालुक्यात अवैध दारूविरोधात धडक कारवाई: दारूभट्टी उद्ध्वस्त, दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

गंगानगर येथे किराणा दुकानातून देशी दारूची विक्री करणाऱ्यावर गुन्हा
Kinwat Illegal Liquor Raid
Kinwat Illegal Liquor Raid Pudhari
Published on
Updated on

Kinwat Illegal Liquor Raid

किनवट : किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (दि.१७) राबविण्यात आलेल्या मास रेड मोहिमेत अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत बोधडी खुर्द येथे अवैध दारूभट्टी उद्ध्वस्त करण्यात आली, तर गंगानगर येथे किराणा दुकानातून देशी दारूची विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोधडी खुर्द येथील तारुसिंग सखाराम कटारे उर्फ तारोमास (वय ४५) हा स्वतःच्या अंगणात मोहफुलाच्या रसायनापासून अवैध दारू तयार करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी कारवाई करून सुमारे ६०० लिटर मोहफुलाचे रसायन जप्त केले असून त्याची किंमत ३६ हजार रुपये आहे.

Kinwat Illegal Liquor Raid
Nanded Crime News : इन्स्टाग्रामवर शस्त्रांचे प्रदर्शन

या प्रकरणी तारुसिंग कटारे याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ६५ (ई) व (फ) अंतर्गत किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७३/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सिद्धार्थ वाघमारे करीत आहेत.

दरम्यान, गंगानगर येथे स्वस्तिक दयानंद आडे (वय २६) हा आपल्या किराणा दुकानातून देशी दारूच्या बाटल्यांची अवैध विक्री करताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून ९० मिली क्षमतेच्या ‘बॉबी संत्रा’ देशी दारूच्या २१ बाटल्या जप्त केल्या असून, जप्त मुद्देमालाची किंमत ८४० रुपये आहे.

Kinwat Illegal Liquor Raid
Nanded Crime : नांदेडात जुगार अड्ड्यावर छापा, ८ जणांवर कारवाई

या प्रकरणी स्वस्तिक आडे याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा क्रमांक १७४/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

किनवट परिसरात अवैध दारू किंवा अन्य बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती द्यावी. यासाठी ८८८८८१३६४९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news