Nanded Crime : नांदेडात जुगार अड्ड्यावर छापा, ८ जणांवर कारवाई

५ लाख ४ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त
Nanded gambling raid
Nanded gambling raidpudhari photo
Published on
Updated on

नांदेड : जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पथकाने एका जुगार अड्ड्यावर धडक कारवाई केली आहे. मोजे वांगी गावाजवळील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या 'तिरट' जुगारावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत ५ लाख ४ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आली.

ग्रामीण पोलिसांचे पथक १३ जुलै रोजी पेट्रोलिंगवर असताना, वांगी गावाजवळ काही जण पैशांची हार-जीत लावून जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी पंचांसह तातडीने घटनास्थळी धाड टाकली. पोलिसांना पाहताच जुगार्‍यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र सतर्क पोलिसांनी पाठलाग करून आरोपींना रंगेहाथ पकडले.

Nanded gambling raid
Solapur crime: मोहोळमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

या कारवाईत अश्पाक कुरेशी, रियाज कुरेशी, अब्दुल रेहमान कुरेशी, जाफर कुरेशी, अब्दुल कलाम पठाण, रशीद कुरेशी, गंगाधर आणि समीर पठाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून ४,९५० रुपयांची रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, ४० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल आणि ४ लाख ६० हजारांच्या पाच मोटारसायकली असा एकूण ५,०४,९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Nanded gambling raid
Nanded Crime News : मनोरंजनाच्या नावाखाली चालत होता जुगार; पोलिसांच्या छाप्यात फुटले बिंग

ही कारवाई पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, उपनिरीक्षक व्यंकट कुसमे व अंमलदार संतोष पवार, भिसे, शेख गफार, टिपरसे, कल्याणकर यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news