Nanded Crime | चिखली (बु.) परिसरात सागाचे लाकूड जप्त; वनविभागाची संयुक्त धडक कारवाई

गुप्त माहितीच्या आधारे छापा; चार सागी गोल जप्त, वनगुन्हा दाखल
Illegal Teakwood Seized Nanded
Illegal Teakwood Seized Nanded Pudhari
Published on
Updated on

Illegal Teakwood Seized Nanded

किनवट : गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाने किनवट तालुक्यातील चिखली (बु.) परिसरात संयुक्त गस्तीदरम्यान कारवाई करत बेकायदेशीररीत्या लपवून ठेवलेले सागाचे लाकूड जप्त केले. या कारवाईत चार सागी गोल (अनगड) हस्तगत करण्यात आले असून, संबंधितांविरुद्ध वनगुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

वनविभागाच्या पथकाने रविवारी (दि. २६) रात्री चिखली (बु.) परिसरात संयुक्त गस्त घातली. यावेळी संशयास्पदरीत्या लपवून ठेवलेले चार सागी गोल आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या लाकडाचे एकूण घनफळ ०.३५८ घनमीटर असून, त्याची अंदाजित किंमत ७ हजार ५५४ रुपये आहे. वनविभागाने तत्काळ हे लाकूड ताब्यात घेत वनगुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Illegal Teakwood Seized Nanded
Nanded Crime News : नांदेडमध्ये तलवार, कुकरी अन् खंजीरासह चार तरुण जेरबंद

ही कारवाई उपवनसंरक्षक (नांदेड) मनीषा पाटील, सहायक वनसंरक्षक किरण चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) धीरज मदने, बोधडीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सी. जी. पोतुलवार तसेच फिरते पथक (किनवट)चे वनपरिक्षेत्र अधिकारी एन. एन. केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत वनपाल बी. टी. जाधव, मनोज गुरसाळी, वनरक्षक रवी दांडेगावकर, मारोती केंद्रे, बालाजी झंपलवाड, अरुण चुक्कलवार यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच खरबी वन्यजीव विभागातील कर्मचाऱ्यांचे आणि वाहनचालक बाळकृष्ण आवले यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news