Nanded illegal sand transport : वाळू तस्करावर कारवाई; ३० लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्‍त

दोन आरोपींविरुद्ध माळाकोळी पोलिसांत गुन्हा दाखल
Nanded illegal sand transport
Nanded illegal sand transportpudhari photo
Published on
Updated on

नांदेड : जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरुद्ध पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेंतर्गत माळाकोळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना रेतीची वाहतूक करणाऱ्या एका हायवा वाहनावर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी एकूण ३० लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

​२९ ऑगस्टच्या रात्री माळाकोळी हायवेवर हायवामधून अवैधरीत्या रेती वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिस पथकाने तत्काळ नाकाबंदी करून वाहन थांबवले. तपासणीदरम्यान वाहनात आवश्यक परवानगीशिवाय भरलेली सुमारे ४ ब्रास रेती आढळून आली.

Nanded illegal sand transport
Nanded e crop survey : आता सहायकांकडून होणार ई-पीक पाहणी

पोलिसांनी पंचनामा करत ३० लाख रुपयांचा हायवा आणि २० हजार रुपयांची रेती असा एकूण ३० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध माळाकोळी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजकुमार हिंगोले, पोउपनि बालाजी रेड्डी आणि पथकाने पार पाडली.

Nanded illegal sand transport
Umarga ADIP camp : ‘ज्यांच्यासाठी शिबीर, त्यांचीच उपेक्षा!’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news