Nanded illegal sand mining : अवैध वाळू उपशावर डीआयजींच्या पथकाचा सर्जिकल स्ट्राईक

गोदावरी नदी पात्रातून तब्बल सव्वा कोटींचा मुद्देमाल जप्त
Nanded illegal sand mining
डीआजींच्‍या पथकाने अवैध वाळू उपसा करणारी पकडलेली वाहने.pudhari photo
Published on
Updated on

नांदेड : जिह्यातील अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरुद्ध सातत्याने मिळणाऱ्या तक्रारींची गंभीर दखल घेत पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने रविवारी (दि. ३०) सायंकाळी नांदेड ग्रामीण ठाण्याच्या हद्दीतील वाहेगाव शिवारात मोठी कारवाई केली. गोदावरी नदीपात्रातून इंजिन बोटीच्या साहाय्याने सुरू असलेला वाळू उपसा उघडकीस आणत पथकाने १ कोटी ३५ लाख ४० हजार रुपयांची साधनसामग्री व १०० ब्रास वाळू जप्त केली आहे.

​वाहेगाव शिवारातील नदीपात्रात इंजिन बोटीच्या साह्याने वाळू उपसा करून ती फायबर बोटीद्वारे किनाऱ्यावर आणली जात असल्याची पक्की माहिती डीआयजी पथकाला मिळाली होती. सायंकाळी ७ च्या सुमारास पथकाने छापा मारला असता तेथे बेकायदेशीर उपसा सुरू असल्याचे स्पष्ट झाले.

Nanded illegal sand mining
Samruddhi Expressway accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सची कंटेनरला धडक; एक ठार, १० प्रवासी जखमी

कारवाईत १ इंजिन बोट, १ फायबर बोट, वाळूने भरलेले १७ तराफे, २ हायवा ट्रक, १ जेसीबी मशीन आणि नदीपात्राबाहेर साठवून ठेवलेली १०० ब्रास वाळू असा एकूण १ कोटी ३५ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

​या प्रकरणी ६ जणांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, पर्यावरण संरक्षण कायदा आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांन्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, पोलीस अंमलदार प्रदीप खानसोळे, गणेश राठोड, संदीप वाघाडे आणि गजानन डवरे यांच्या पथकाने केली. कामगिरीबद्दल डीआयजी शहाजी उमाप यांनी पथकाचे कौतुक केले आहे.

Nanded illegal sand mining
Nanded Crime : नंदगावच्या सरपंचाचा पंचायत समिती आवारात जीवन संपवण्याचा प्रयत्न

'खबर' हेल्पलाइनवर द्या अवैध व्यवसायांची माहिती

​नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांचे उच्चाटन करण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने 'खबर' नावाने विशेष हेल्पलाइन सुरू केली आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती ९१ ५० १०० १०० या मोबाईल क्रमांकावर थेट पोलिसांपर्यंत पोहोचवावी, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन डीआयजी शहाजी उमाप यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news