Beed leopard sighting : गंगावाडी शिवारात दोनदा बिबट्याचे दर्शन!

एका आदिवासी कुटुंबातील लहान मुलावर बिबट्याने झेप घेतल्याची चर्चा
Beed leopard sighting
Beed leopard sightingpudhari photo
Published on: 
Updated on: 

गेवराई : गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन रोडवरील गंगावाडी शिवारात शुक्रवार आणि शनिवारी अशा सलग दोन दिवसांत दोन वेळा बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. शेतकरी व आदिवासी बांधवांनी बिबट्या पाहिल्याचे सांगितले असून, एका आदिवासी कुटुंबातील लहान मुलावर बिबट्याने झेप घेतल्याची चर्चा आहे.‌प्रत्यक्ष दुजोरा मिळाला नाही.

गंगावाडी येथील जालिंदर धांडे यांच्या शेतातील पन्हाळा ओढ्यालगत असलेल्या सर्व्हे क्रमांक ४३० मध्ये बिबट्या दिसल्याची माहिती आहे. याच परिसरात शंकर नवले यांची सर्व्हे क्रमांक ४३२ मधील शेती आहे. या भागात कोळसा पाडण्याच्या कामासाठी काही आदिवासी कुटुंबे लहान मुलांसह वास्तव्यास आहेत.

Beed leopard sighting
Latur sugarcane price demand : उसाला प्रतिटन ४,२०० रुपये भाव द्या

गंगावाडी शिवारात सध्या कापूस वेचणी, ऊसतोडणी तसेच इतर शेतीची कामे सुरू आहेत. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि महिला मोठ्या संख्येने शिवारात ये-जा करतात. त्याचबरोबर आदिवासी कुटुंबांची पाल असलेली वस्तीही या परिसरात असल्याने बिबट्याच्या दर्शनामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, वनविभागाने या घटनेची तातडीने दखल घेऊन गंगावाडी शिवारात पाहणी करावी, बिबट्याच्या पायाचे ठसे व हालचालींचा मागोवा घ्यावा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Beed leopard sighting
Beed Water Crisis : तब्‍बल सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आष्टीचा पाणीपुरवठा सुरळीत

वनविभागाने तातडीने पाहणी करून बंदोबस्त करावा

गंगावाडी शिवारात दोन दिवसांत दोनदा बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतात कामासाठी जाणेही शेतकऱ्यांना धोकादायक वाटू लागले आहे. परिसरात आदिवासी कुटुंबे व लहान मुले वास्तव्यास असल्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन वनविभागाने तातडीने पथक पाठवून पाहणी करावी व बिबट्याच्या वावरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.