Nanded Crime | नांदेड : दोन घरफोड्यांचा उलगडा, एकास रंगेहाथ पकडले

​१.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
Nanded Theft Cases
Nanded Theft Casespudhari photo
Published on: 
Updated on: 

​नांदेड: नांदेड शहर व परिसरात घरफोडी व चोरी करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत दोन घरफोडींचे गुन्हे उघडकीस आणले असून एका आरोपीस रंगेहाथ अटक केली आहे. त्याच्याकडून १ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

​सय्यद शारेख सय्यद शाहजेब (वय १९, रा. रहेमतनगर, देगलूर नाका, नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.​मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखेचे पथक नूरी चौक परिसरात गस्त घालत असताना, माळटेकडी पुलाखाली एक संशयित इसम चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने विकण्यासाठी ग्राहक शोधत असल्याची गुप्त माहिती मिळाली.

Nanded Theft Cases
Eknath Shinde : मोदी सरकारची लोकप्रियता विरोधकांना सहन होत नाही

पोलिसांनी तातडीने सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले. पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत त्याच्याकडून १ लाख १० हजारांचे दागिने आणि १८ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण १.२८ लाखांचा मुद्देमाल मिळून आला.

सखोल चौकशीत आरोपीने आपल्या साथीदारांच्या (शेख सलमान व शेख अरबाज) मदतीने हरिओम नगर (तरोडा बु.) आणि हडको परिसरातील बंद घरे फोडून चोरी केल्याची कबुली दिली. याप्रकरणी विमानतळ व नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

Nanded Theft Cases
E-Mojani Maharashtra: ई-मोजणीला नागरिकांचा प्रतिसाद; २,२८८ अर्ज प्रलंबित

आरोपीस पुढील कारवाईसाठी विमानतळ पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ​ही कामगिरी पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पीएसआय नागनाथ तुकडे, दारासिंग राठोड, मोहन हाके, सुनील गटलेवार व सायबर सेलच्या पथकाने पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news