Nanded Death Case | हिमायतनगर येथे कोचिंग क्लासेसच्या संचालकाने गळफास घेऊन जीवन संपविले

क्लासेसच्या आवारातील चिंचेच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
Nanded Himayatnagar Coaching Class Director Death
एन. टी. जाधव Pudhari
Published on
Updated on

Nanded Himayatnagar Coaching Class Director Death

हिमायतनगर : हिमायतनगर शहरातील एका नामांकित कोचिंग क्लासेसचे संचालक एन. टी. जाधव यांनी गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना शुक्रवारी ( दि.१० ) पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे शहरासह परिसरातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या कोचिंग क्लासमधून शहर व ग्रामीण भागातील सुमारे १,२०० विद्यार्थी शिक्षण घेत होते. एन. टी. जाधव हे शिस्तप्रिय, अभ्यासू आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जात होते. अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले होते.

Nanded Himayatnagar Coaching Class Director Death
Nanded Mumbai Flight | नांदेड-मुंबई विमानसेवा लवकरच

शुक्रवारी पहाटे क्लासेसच्या आवारातील चिंचेच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच हिमायतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि पुढील तपास सुरू केला.

दरम्यान, काही दिवसांपासून सुरू असलेल्या जागेच्या वादामुळे ते मानसिक तणावाखाली असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. मात्र, नेमके कारण पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

Nanded Himayatnagar Coaching Class Director Death
Nanded Fraud news : सहकारी शिक्षण पतपेढीतील नियमबाह्य नौकरभरती व आर्थिक गैरव्यवहार

एन. टी. जाधव यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे हिमायतनगर परिसरात शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news