Nanded News : गारपीटीने नायगाव, देगलूरमधील १ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; कंधारमध्ये वीज पडून एक ठार

Nanded News : गारपीटीने नायगाव, देगलूरमधील १ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; कंधारमध्ये वीज पडून एक ठार
Published on
Updated on

नांदेड, पुढारी वृत्तसेवा: नांदेड जिल्हयातील नायगाव, कंधार, किनवट, देगलूर, हदगाव या तालुक्यात मागील दोन दिवसांत वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसाने थैमान घातले. यात नायगाव, देगलूरमध्ये जवळपास १ हजार २८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. Nanded News

ज्वारी, गहू, करडी, उन्हाळी उडीद, उन्हाळी तूर या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच कंधारमध्ये वीज पडून एक ठार व एका घराची पडझड झाली आहे. याशिवाय तीन जनावरे दगावली आहेत. इतर तालुक्यात नुकसानकरक स्थिती नसल्याचे सांगण्यात आले आहे.
नांदेड जिल्हयात मागील दोन महिन्यात चार वेळा गारपीट व आवकाळी पाऊस झाला आहे. सध्या गहू, ज्वारी, हरभरा काढणीची शेतशिवारात लगबग सुरू आहे. तसेच हळद काढणी करून ती शिजवण्याची प्रक्रियाही सुरू आहे. वादळीवारे, गारपीट व अवकाळी पावसाने पिकांना फटका बसला आहे. विशेषता: नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात शनिवारी जवळपास अर्धा तास वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पाऊस झाला होता. Nanded News

या तालुक्यात सर्वाधिक ८५२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. देगलूर तालुक्यात १७६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय कंधार तालुक्यातील येलूर येथील शेतकरी बालाजी व्यंकटराव शिंदे (वय २२) यांचे शेतामध्ये वीज पडून मृत्यू झाला. तर, याच तालुक्यातील शिरसी बुद्रुक येथील शेतकरी बालाजी गयानोबा कैलासे यांचा बैल दगावला. शिरूर येथील शिवाजी माधवराव जाधव यांचे घर पडले आहे.

दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील मुदखेड, भोकर व हिमायतनगर या तालुक्यात वादळी वारा व पावसाचा शिडकावा झाला. तर अन्य तालुक्यांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. हातातोंडाशी आलेला घास हिरवल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. शासनाने तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news