Hadgaon Theft Attempt | हदगाव शहरात चोरट्याकडून शटर तोडण्याचा प्रयत्न; घटना सीसीटीव्हीत कैद

शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Nanded Hadgaon Shutter Breaking Incident
अज्ञात चोरट्याने भुसार दुकानाचे शटर तोडण्याचा प्रयत्न केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेPudhari
Published on
Updated on

Nanded Hadgaon Shutter Breaking Incident

हदगाव : शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकत्याच घडलेल्या घटनेत एका अज्ञात चोरट्याने भुसार दुकानाचे शटर तोडण्याचा प्रयत्न केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून उघड झाले आहे.

ही घटना तामसा राज्य महामार्गावरील गणेश ट्रेडिंग कंपनी (भुसार) येथे २२ मार्चरोजी पहाटे सुमारे ३.३० वाजता घडल्याची माहिती समोर आली आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या चोरट्याच्या हालचालींवरून तो कोणत्याही भीतीशिवाय कृत्य करत असल्याचे स्पष्ट दिसते.

Nanded Hadgaon Shutter Breaking Incident
Nanded News | महावितरणचा मनमानी कारभार? थकबाकीच्या कारणावरून दावणगीर संपूर्ण गाव अंधारात

दरम्यान, शहरात आणि परिसरात अशा प्रकारे दुकानांची शटर तोडण्याचे प्रयत्न वारंवार होत असल्याची माहिती काही व्यापाऱ्यांनी दिली आहे. मात्र, अनेक व्यापाऱ्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार नोंदवलेली नसल्याचेही समोर आले आहे.

या गंभीर प्रकाराची माहिती स्थानिक पोलिसांकडे नसल्याचे दिसून येत असून, पोलिसांकडून या घटनांकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. परिणामी, चोरट्यांचे मनोबल वाढत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Nanded Hadgaon Shutter Breaking Incident
Nanded news | किनवट बाजार समितीचा कारभार चव्हाट्यावर; सोयाबीनचे चुकारे थकल्याने गोदामाला ठोकले सील

वाढत्या चोरीच्या घटना आणि गुन्हेगारीमुळे व्यापारी तसेच नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. काहींनी तर अशा घटनांनंतर पोलिसांकडे तक्रार करण्यासही नकार दिल्याचे चित्र आहे.

पूर्वी पोलिस ठाण्यात धार्मिक सण किंवा विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने शांतता समितीच्या बैठका आयोजित केल्या जात असत. या बैठकींमध्ये नागरिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि पत्रकार सहभागी होत असत. या संवादातून पोलिस व नागरिक यांच्यात समन्वय निर्माण होऊन अनेक प्रश्न सोडवले जात होते. मात्र, सध्या अशा बैठका होत नसल्याची खंत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news