Nanded crime : नांदेडमध्ये सोनसाखळी चोर गजाआड; पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त

आरोपी भाग्यनगर पोलिसांच्या स्वाधीन
Nanded crime
नांदेडमध्ये सोनसाखळी चोर गजाआड; पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्तPudhari
Published on
Updated on

नांदेड : शहर व परिसरात सोनसाखळी चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांतील सराईत आरोपीस जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाला यश आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या सूचनेनुसार राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत ही धडक कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपीकडून १ लाख ७५ हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी व एक दुचाकी जप्त केली आहे.

मोहम्मद आफताब ऊर्फ अयु अब्दुल खदीर (वय २२, रा. मोमीनपुरा, नांदेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. २४ ऑगस्ट रोजी कौठा भागातील मामा चौक येथे एक इसम चोरीचे दागिने विकण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली. त्या आधारे पोलिसांनी सापळा रचून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आफताबला शिताफीने ताब्यात घेतले.

Nanded crime
Nanded ganja seizure : नांदेडमध्ये ३ लाखांच्या गांजासह दोघांना रंगेहाथ पकडले; एलसीबीची धडक कारवाई

​कडक चौकशीत त्याने भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जय भवानी नगर भागात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याची (गु.र.नं. १०७/२०२६) तसेच अर्धापूर येथील दुर्गानगरमध्ये बंद घर फोडल्याची (गु.र.नं. १५५/२०२६) कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ९ ग्रॅम सोन्याची साखळी (किंमत ₹१,३५,०००) आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (किंमत ₹४०,०००) हस्तगत केली.

Nanded crime
Bhoom police action : विना नंबरप्लेट, काळ्या फ्रेमच्या वाहनांवर कारवाई

​पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे व त्यांच्या पथकाने ही मोहीम फत्ते केली. आरोपीला भाग्यनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, त्याच्या फरार साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news