नांदेडच्या लेकीची आंतरराष्ट्रीय भरारी; ६१ लाखांचे पॅकेज

येथील श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्र शिक्षण संस्थेतील (एसजीजीएस) बी.टेक. मेकॅनिकलची विद्यार्थिनी साक्षी तेजराम ठाकरे हिने यशाचे शिखर गाठले आहे.
nanded news
नांदेडच्या लेकीची आंतरराष्ट्रीय भरारी; ६१ लाखांचे पॅकेजfile photo
Published on
Updated on

Nanded girl gets a package worth 61 lakhs at the international level

नांदेड, पुढारी वृत्तसेवा :

येथील श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्र शिक्षण संस्थेतील (एसजीजीएस) बी.टेक. मेकॅनिकलची विद्यार्थिनी साक्षी तेजराम ठाकरे हिने यशाचे शिखर गाठले आहे.

nanded news
Illegal Liquor Seized | कुंटूर येथे कारसह २.३० लाखांचा अवैध देशी दारूचा साठा जप्त; एकावर गुन्हा दाखल

नेदरलँडमधील स्कीप्सवर्फ या नामवंत आंतरराष्ट्रीय कंपनीत तिची निवड झाली असून, तिला वार्षिक ६१ लाख रुपयांचे घसघशीत पॅकेज मिळाले आहे. संस्थेच्या मेकॅनिकल विभागातील ही पहिलीच आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट ठरल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.

nanded news
भारत-अर्जेंटिना संसदीय मैत्री गटाच्या अध्यक्षपदी खा. अशोकराव चव्हाण

साक्षीने तिचे प्राथमिक शिक्षण नागपूरच्या सेंट जोसेफ हायस्कूलमधून पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी तिने नांदेडच्या एसजीजीएस संस्थेची निवड केली. सध्या ती मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात शिकत आहे. नुकत्याच झालेल्या कॅम्पस मुलाखतींमध्ये तिने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर हे यश खेचून आणले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news