Nanded Crime : नांदेडमध्ये तलवारीसह बनावट बंदूक जप्त; दोन जणांना अटक

गुन्हे शोध पथकाकडून दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाया
Nanded Crime News
नांदेडमध्ये तलवारीसह बनावट बंदूक जप्त; दोन जणांना अटकpudhari photo
Published on
Updated on

नांदेड ः पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मंगळवारी (ता. 5) दोन स्वतंत्र कारवाया करत एकाला अटक केली असून, एका विधीसंघर्षग्रस्त बालकावर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून एक तलवार आणि हुबेहूब अग्निशस्त्रासारखी दिसणारी छऱ्याची बंदूक जप्त करण्यात आली आहे.

भाग्यनगर पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथक पेट्रोलिंग करत असताना, मालेगाव रोडवरील शिवरायनगर भागात एका अल्पवयीन मुलाकडे अग्नीशस्त्र असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने सापळा रचून संबंधित विधीसंघर्षग्रस्त बालकाची अंगझडती घेतली. यावेळी त्याच्याकडे 12,000 रुपये किमतीची, हुबेहूब खऱ्या पिस्तुलासारखी दिसणारी छऱ्याची बंदुक आढळून आली.

Nanded Crime News
Satara Crime: साताऱ्याजवळ दोन बंदुका जप्त

पोलिसांनी ती जप्त केली असून, त्याच्यावर शस्त्र अधिनियमान्वये कारवाई करण्यात आली आहे. दुसऱ्या घटनेत, नेरली परिसरात एक तरुण हातात उघडी तलवार घेऊन दहशत निर्माण करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेतली. जमीर मुक्तारखान पठाण याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 1500 रुपये किमतीची तलवार जप्त केली.

Nanded Crime News
MD Drug Factory Raid: महाराष्ट्र एएनटीएफच्या कारवाईने बंगळुरू हादरले

ही कामगिरी पोलीस निरीक्षक संतोष तांबे, महेश माळी, फौजदार विनोद देशमुख, नरेश वाडेवाले, बजरंग जाधव, विशाल माळवे व पथकाने केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news