Nanded Hunger Strike | पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी एकंबा ग्रामस्थांचे आमरण उपोषण

दोन महिन्यांपासून नदी कोरडी; जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह नळयोजनाही ठप्प, प्रशासनाच्या आश्वासनानंतरही आंदोलकांचा निर्धार कायम
Ekamba Village Hunger Strike
Ekamba Village Hunger StrikePudhari
Published on: 
Updated on: 

Painganga River Water Release Ekamba Village Hunger Strike

हिमायतनगर : विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी गेल्या दोन महिन्यांपासून कोरडी पडली आहे. नदीपात्रात पाणी सोडले जात नसल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, गावातील नळयोजनाही ठप्प झाल्या आहेत. या परिस्थितीच्या निषेधार्थ हिमायतनगर तालुक्यातील एकंबा येथील ग्रामस्थांनी गुरुवारपासून थेट कोरड्या नदीपात्रात आमरण उपोषण सुरू केले आहे.

एकंबा, कोठा तांडा, सेलोडा आणि शिरपल्ली या गावांना पाणीटंचाईची मोठी झळ बसत आहे. पैनगंगा नदीपात्रात गेल्या दोन महिन्यांपासून पाणी नसल्याने नागरिकांसह शेतकरी आणि पशुपालकांचे हाल होत आहेत. जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नसून, गावातील पाणीपुरवठा योजनाही बंद पडल्या आहेत. नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागाकडे वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा केला. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.

Ekamba Village Hunger Strike
Nanded News : बस चालकाला मारहाण करणाऱ्यास सक्तमजुरी

दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी चार वाजता तहसीलदार पल्लवी टेमकर, गटविकास अधिकारी पांडुरंग नारवटकर, मंडळाधिकारी बी. एम. चव्हाण आणि विस्तार अधिकारी टारपे यांच्यासह प्रशासनातील अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट दिली. त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून नदीपात्रात पाणी सोडण्यासंदर्भातील मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले.

मात्र, केवळ आश्वासन देऊन पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. प्रत्यक्ष नदीपात्रात पाणी सोडल्याशिवाय आमरण उपोषण मागे घेणार नसल्याचा ठाम निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला. लोकप्रतिनिधींनीही या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

Ekamba Village Hunger Strike
Nanded News : प्रारूप मतदार यादीसाठी उद्यापासून सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबीर

पैनगंगा नदी कोरडी पडल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांसमोर पाण्याचे गंभीर संकट उभे राहिले आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन नदीपात्रात पाणी सोडण्याबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे. आता प्रशासन केवळ आश्वासन देण्यापलीकडे जाऊन प्रत्यक्ष कार्यवाही कधी करणार, याकडे एकंबासह परिसरातील गावांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.