Nanded Crime : नांदेडमध्ये घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड

मुदखेड येथील घटना : एलसीबीच्या पथकाने छापा टाकून ४६ गॅस सिलिंडर केले जप्त
Nanded Crime News
घरगुती गॅसच्या काळाबाजाराचा पोलिसांनी पर्दाफाश केला.pudhari photo
Published on
Updated on

नांदेड : नांदेड जिह्यात घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा वापर होत असून, मुदखेड येथील एकाने चक्क घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा अवैधरीत्या साठा करून गॅस सिलिंडरमधून ऑटोत गॅस भरण्याचा उद्योग चालविला होता. नांदेडच्या एलसीबीच्या पथकाने मुदखेड येथे छापा टाकून तब्बल दीड लाख रुपये किमतीचे ४६ सिलिंडर, इलेक्ट्रिक मोटार, इलेक्ट्रिक वजन काटा जप्त करत एकाला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एलसीबीचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी पोलिस उपनिरीक्षक महेश कोरे यांचे पथक पाठवून मुदखेड येथील महात्मा फुले चौक येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरीत्या घरगुती वापराचे सिलिंडरचा वापर करून ऑटोत गॅस भरत असताना शेख अय्युब शेख महेमूद (४५, रा. नवी अबादी, मुदखेड) यास रंगेहात पकडले. त्याच्याकडून तब्बल विविध कंपन्यांचे ४६ भरलेले सिलिंडर, इलेक्ट्रिक मशीनच्या सहाय्याने भरणारे मशीन, वजन काटा असा दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

Nanded Crime News
Nanded drowning case : सेल्फीच्या नादात अभियंत्याचा बुडून मृत्यू

गॅस सिलिंडरचा काळाबाजार करून नागरिकांच्या जीवितास खेळण्याचा हा धक्कादायक प्रकार असून, गेल्या किती दिवसांपासून हा गोरखधंदा शेख अय्युब करत होता. त्याला कोणकोण मदत करत होते, याचा पोलिसांना शोध घ्यावा लागणार आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्याच्या कंपनीचे घरगुती वापराचे सिलिंडर ब्लॅकमध्ये घेऊन ते ऑटोत गॅस भरण्यासाठी वापर करून त्याचे पैसे करणाऱ्या शेख अय्युब याचे पाळेमुळे पोलिस खोदतील काय आणि या रॅकेटचा पर्दाफाश करणे महत्त्वाचे आहे.

गॅस सिलिंडरचा काळाबाजार

विविध कंपन्यांच्या गॅस सिलिंडरचा वापर करत ऑटोत गॅस भरण्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने, घरगुती गॅसचा किती मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत आहे ही बाब यानिमित्ताने पुढे आली आहे. अत्यंत संवेद-नशील आणि ज्वलनशील पदार्थांचा वापर होत असल्याने यात मोठे रॅकेट काम करत असल्याचे बाब अधोरेखित होत आहे.

Nanded Crime News
Parbhani ZP Politics : मुख्यमंत्र्यांची शिष्टाई; महायुतीतील तिन्ही घटक पक्ष झेडपीच्या सत्तेत सहभागी होणार !

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news