

विशेष प्रतिनिधी
नांदेड : भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीच्या गेल्या ३० वर्षांतील तीन राजवटींमध्ये डी. बी. पाटील यांना जेमतेम दीड वर्ष मिळालेली राज्यमंत्रिपदाची संधी वगळता युतीच्या जिल्ह्यातील एकाही आमदारास 'नामदार होता आले नाही. या पार्श्वभूमीवर नवे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या नव्या राजवटीत जिल्ह्याला 'लाल दिव्या'ची अपेक्षा असली, तरी त्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार, असे दिसते.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जिल्ह्यातील सर्व ९ जागांवर घवववीत यश प्राप्त करून जिल्ह्याच्या राजकारणात नवा विक्रम स्थापित केला. भाजपाने ५, शिवसेनेने ३ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने १ जागा विकून काँग्रेस आघाडीला जबर दणका दिल्यानंतर नव्या सरकारमध्ये जिल्ह्याला प्रतिनिधिाय मिळाले पाहिजे, अशी अपेक्षा महायुतीच्या कार्यकत्यांनी व्यक्त केली आहे.
राज्यात १९९५ साली भाजपा-सेना युतीचे सरकार पहिल्यांदा स्थापन झाले. या सरकारच्या साडेचार वर्षाच्या राकपटीत किनवटचे तत्कालीन भाजपा आमदार डी. बी. पाटील यांना काही काळ राज्यमंत्रिपदाची संधी मिळाली. नंतर युतीला आपले सरकार आणण्यासाठी १५ वर्षे बाट पाहावी लागली. २०१४ साली शिवसेनेचे तर भाजपाचा एक आमदार निवडून आला, पण तेव्हाच्या फडणवीस सरकारमध्ये जिल्ह्यातील एकही आमदार 'नामदार' होऊ शकला नाही. आता राष्ट्रबादी'कडून निवडून आलेले प्रताप पाटील चिखलीकर हे २०१४ साली शिव सेनेकडून निवडून आले होते, पण सेना नेतृत्वाने त्यांना मंत्रिपदापासून वंचित ठेवले असता ते तिसऱ्यांदा विधानसभेत गेले असून मंत्रिपदासाठी आपला विचार झाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे.
भाजपातर्फे डॉ तुषार राठोड हे मंत्रिपदाचे दावेदार आहेत निवडणूक प्रचाराद्रस्थान स्वतः फडणवीस यांनी त्यांना नामदार करण्याची यो षणा मुखेडच्या जाहीर सभेमध्ये केली होती. याच पक्षाचे भीमराव वे केराम हेही तिसऱ्यांदा तर राजेश पवार व जीतेश अंतापूरकर दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आले आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया यांनी प्रथमच पदार्पण केले आहे. या पाच जणांमधून मंत्रिमंडळात कोणाला स्थान द्यायचे, याचा फैसला देवेन्द्र फडणवीस करणार असल्याचे सांगण्यात व्जाले. पण तुषार राठोड यांना सर्वाधिक संथी असल्याची माहिती अशोक चकच्छाण यांच्या एका निकटवर्तीयाने दिली.
१९९५ ते २०२४ या कालखंडात झालेल्या विधानसभा निवडणुकांत नांदेड जिल्ह्यातून केवळ तिथे मंत्रिपदाचे धनी झाले. युतीच्या राजवटीत डी. बी. पाटील हे राज्यमंत्री होते. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी १९९९ ते २००८ पर्यंत मंत्रिपद भूषवून मुख्यमंत्रीपती ड्रीप घेतली. त्यांचे हे पद अकाली गेल्यानंतर त्यांचेच सहकारी डी.पी. सावंत यांना चार वर्षे राज्यमंत्रिपद मिळाले. त्यानंतर २०१९ मे २१ दरम्यान अशोक चव्हाण पुन्हा मंत्री झाले. पण शिंदे सरकारमध्ये नांदेड जिल्ह्यातून कोणालाही स्थान मिळाले नाही.