NDCC bank election : आंबुलगा सोसायटीचे धोरण; सामाजिक न्यायाचे ‌‘तोरण!‌’

मतदानासाठी मागासवर्गीय महिलेला संधी
NDCC Bank
NDCC Bankpudhari photo
Published on
Updated on

विशेष प्रतिनिधी

नांदेड ः नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या आगामी निवडणुकीसाठी मुखेड तालुक्याच्या जम्बो मतदार यादीत आजी-माजी आमदारांसह दिग्गजांची नावे समाविष्ट झालेली असताना याच तालुक्याच्या अंबुलगा येथील संस्थेने आपला मतदान प्रतिनिधी म्हणून एका मागासवर्गीय महिलेला संधी देत सामाजिक न्यायाचे उदाहरण घालून दिले आहे.

बँकेच्या मतदार यादीसाठी जिल्ह्यातील सेवा सहकारी संस्था तसेच इतर सभासद संस्थांच्या प्रतिनिधींची नावे तालुकास्तरीय सहकार अधिकाऱ्यांकडे दाखल करण्याची मुदत 15 एप्रिल रोजी संपली. त्यानंतर प्रत्येक तालुक्यातल्या मतदारांची यादी जिल्हा उप निबंधक कार्यालयाकडे सादर करण्यात आल्यानंतर मुखेडमधील वरील चांगले उदाहरण समोर आले.

NDCC Bank
नांदेड बँक निवडणूक- मतदारयादी प्रक्रियेपासूनच 'लक्ष्मीदर्शन' सुरू!

मुखेड बाजार समितीचे सभापती बालाजीराव पाटील अंबुलगेकर हे आपल्या गावातील सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष आहेत. जिल्हा बँकेच्या मतदार यादीसाठी त्यांना स्वतःचे किंवा अन्य प्रस्थापितांतून एकाचे नाव समाविष्ट करण्यास मोठा वाव होता; पण अंबुलगा सोसायटीने सविता व्यंकटराव कल्याणपाड या सामान्य मागासवर्गीय महिलेच्या नावाचा ठराव पारित करून सह निबंधक कार्यालयाकडे दाखल केला. त्यांचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट झाले आहे. स्वतः सविता कल्याणपाड यांनी ही माहिती एका पत्रकाद्वारे दिली.

मुखेड तालुक्याच्या मतदार यादीत भाजपाचे विद्यमान आमदार डॉ.तुषार गोविंद राठोड, माजी आमदार व बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, त्यांच्या पत्नी सुशीलाबाई पाटील, माजी आमदार अविनाश घाटे, व्यंकटराव पाटील गोजेगावकर, स्वप्नील व सुशांत चव्हाण हे बंधू यांच्यासह तालुक्यातील दिग्गजांची नावे दिसून आली.

NDCC Bank
NDCC bank election : कार्यकर्त्यांना वनवास; नांदेड जिल्हा बँकेत येणार ‌‘वारसराज!‌’

आ.राठोड यांचे बंधू गंगाधर राठोड यांचे नाव तर दोन वेगवेगळ्या मतदारसंघांच्या यादीमध्ये विराजमान झाले आहे. या तालुक्यात सेवा सहकारी संस्थांपैकी 92 संस्थांनी आपल्या प्रतिनिधींची नावे मतदार यादीसाठी पाठविली. त्यात मराठा समाजातील मतदारांचा वरचष्मा दिसून येतो.

नायगावच्या यादीत दिग्गजांची नावे!

नायगाव तालुक्यातून जिल्हा बँकेच्या अ, ब, क या तीन मतदारसंघांसाठी 100 नावे तालुका सह निबंधकांकडे दाखल झाली आहेत. या तालुक्यातल्या मतदारांमध्ये खा.रवींद्र चव्हाण, आ.राजेश पवार, ज्येष्ठ नेते माधवराव पाटील शेळगावकर, जि.प.चे माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर, राजेश गंगाधरराव कुंटूरकर, नायगावचे श्रीनिवास व्यंकटराव चव्हाण, श्रावण शंकरराव भिलवंडे, मंगलाबाई रामराव रातोळीकर, वसंत सुगावेंचे बंधू केशव सुगावे, संजय शेळगावकर इत्यादींचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news