Nanded crime : सिंदखेड पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; २.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी पंचांसमवेत घटनास्थळी छापा टाकला असता पाच जण जुगार खेळताना आढळून आले
Nanded crime : सिंदखेड पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; २.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त
Published on
Updated on

सिंदखेड : नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत सिंदखेड पोलिसांनी जुगार अड्ड्यावर यशस्वी धाड टाकून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य व पाच दुचाकी वाहने असा एकूण ₹२,२८,१०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पाच आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोधुळे व त्यांच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत मौजे गोंडवडसा (ता. माहूर) येथील सार्वजनिक मोकळ्या जागेत काही व्यक्ती "झन्ना-मन्ना" नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमवेत घटनास्थळी छापा टाकला असता पाच जण जुगार खेळताना आढळून आले.

Nanded crime : सिंदखेड पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; २.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त
Nanded Crime | आंतरजिल्हा घरफोडी टोळीचा पर्दाफाश; नांदेड पोलिसांचा मोठा दणका!

पोलिसांनी आरोपींची अंगझडती व घटनास्थळाची तपासणी केली असता रोख रक्कम, जुगाराचे साहित्य तसेच पाच दुचाकी वाहने असा एकूण ₹2.28 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 76/2026 नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Nanded crime : सिंदखेड पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; २.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त
Nanded Crime|नांदेड : प्रेमसंबंधाच्या वादातून युवकाचा चाकूने भोसकून खून

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोधुळे व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. नांदेड पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधातील कारवाई पुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असून अशा बेकायदेशीर कृत्यांची माहिती नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news