Nanded Crime|नांदेड : प्रेमसंबंधाच्या वादातून युवकाचा चाकूने भोसकून खून

चौघांवर गुन्हा : मुख्य संशयितासह तिघे ताब्यात
Nanded Crime  News
सचिन यशवंत काळेpudhari photo
Published on
Updated on

नांदेड : शहरातील आसना नदीच्या पुलाजवळ रस्त्यालगत शनिवारी (११ जुलै) मध्यरात्रीनंतर घडलेल्या सचिन यशवंत काळे (वय २४, रा. नुरी चौक, नांदेड) या युवकाच्या खळबळजनक हत्याकांडात विमानतळ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, मुख्य संशयित आरोपीसह तिघांना ताब्यात घेतले आहे. प्रेमसंबंधाच्या वादातूनच हा खून झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.​

Nanded Crime  News
Beed Hunger Strike | अल्पवयीन मुलीच्या न्यायासाठी आईचे आमरण उपोषण; आष्टी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण

​या प्रकरणात विमानतळ पोलिस ठाण्यात चार आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी राजेश दत्ता राजेगोरे (वय २४, रा. शेलगाव, ता. अर्धापूर) याच्यासह त्याच्या इतर तीन साथीदारांना तत्काळ ताब्यात घेतले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मुख्य आरोपी राजेश राजेगोरे याचे मयत सचिन काळे याच्या पुतणीसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाला सचिन काळे याचा तीव्र विरोध होता. याच कारणावरून त्यांच्यात वाद सुरू होते. याच वादाचा वचपा काढण्यासाठी राजेश राजेगोरे याने आपल्या मित्रांच्या मदतीने सचिनचा काटा काढण्याचा कट रचला.

​शनिवारी मध्यरात्रीनंतर सचिन काळे हा आसना पूल परिसरातून जात असताना, आरोपींनी त्याला रस्त्यात गाठले. जुन्या भांडणाची कुरापत काढून आरोपींनी सचिनवर धारदार चाकूने सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, गंभीर जखमी झालेल्या सचिनचा मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन घटनास्थळीच तडफडून मृत्यू झाला. या थरारक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Nanded Crime  News
Gangapur News : पतीचे अनैतिक संबंध असल्याची भीती दाखवत ५ लाखांचा गंडा

​या प्रकरणातील चौथ्या आरोपीचा शोध सुरू असून, विमानतळ पोलिस आरोपींची कसून चौकशी करत आहेत. भररस्त्यात झालेल्या या निर्घृण हत्येमुळे नांदेड शहरात कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रामदास शेंडगे हे करत आहेत.

विमानतळ पोलिसांकडून वेगवान तपास

​घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक सूरज गुरव, विमानतळ पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ताफा तातडीने घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांची ओळख पटवली आणि काही तासांतच मुख्य आरोपी राजेश राजेगोरे याच्यासह तिघांना बेड्या ठोकल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news