

Nanded Crime: Raid on Gambling Den; Seven Gamblers Apprehended
नवीन नांदेड, पुढारी वृत्तसेवा गोपाळ चावडी ते बाभुळगावकडे जाणाऱ्या रोडवर लिंवाच्या झाडाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून नांदेड ग्रामीण पोलिसांनी सात जुगारींना जेरबंद केले आहे.
पोलिस अधीक्षक, अविनाश कुमार, अपर पोलिस अधीक्षक, अर्चना पाटील, सुरज गुरव, उप विभागीय पोलीस अधिक्षक प्रशांत शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि ज्ञानेश्वर मटवाड, अर्जुन मुंडे, विष्णु कल्यानकर, संतोष पवार, गवेंद्र सिरमलवार, शेख फय्याज यांनी ९ मे रोजी पेट्रोलिंग करीत असतांना सायंकाळी साडेपाच वाजता गोपनीय माहिती वरून गोपाळ चावडी ते बाभुळगावकडे जाणारे रोडवर लिंवाचे झाडा खाली गोपाळ चावडी येथे धाड टाकली असता काही जण तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. लिस्ट नावाचा जुगार खेळत असतांना मिळून आल्याने सदर इसमांना पकडून दोन पंचा समक्ष जप्ती पंचनामा करून गुन्हे दाखल करण्यात आले.
पोलिसांनी दिनेश लक्ष्मणराव जोंधळे वय ३८ वर्ष रा. गोदावरी ब्रिज जवळ जुना मोंढा नांदेड, गुलाब सदाशिव घोरबांड वय ४३ वर्ष रा. ज्ञानेश्वर नगर सिडको, विजय हरीभाऊ पाटील वय ३५ वर्ग रा. वात्सल्य नगर सोसायटी हाडको, दत्तराव गोविंदराव फुलकाने वय ५६ वर्ग रा. हिंगणी ता. माहूर, संजय बालाजी शिंदे वय ४० वर्ष रा. गोपाळ चावडी, संजय निवृती जोंधळे वय ५० वर्ष रा. नावघाट नांदेड, आनंदा नागोराव हैवतकर वय ४१ वर्ष रा. गोप-ाळचावडी यांच्याकडून पाच दुचाकीसह मोबाईल व नगदी रूपये आणि जुगाराचे साहित्य असा एकूण सुमारे पाच लाखा-हून अधिक रुपयांचा मुद्देमाल ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.