Nanded crime: अल्पवयीन पिडीतेवर लैगिंक अत्याचार प्रकरणी अरोपीस दुहेरी जन्मठेपेची शिक्षा

मुखेड पोक्सो न्यायालयाचा निकाल
Life Imprisonment
Life ImprisonmentPudhari
Published on
Updated on

मुखेड : अल्पवयीन पिडीता एकटीच घरी असताना, पावसाचे थेंब येत असल्याने अरोपीने शेजारी राहणा-या पिडीतेस घरात कपडे वाळु घालण्यास सांगितले. ती घरात गेली असताआरोपीने दरवाजा बंद करुन तोंडात बोळा कोंबुन लैंगिक अत्याचार केले होते. पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी बाबुराव ग्यानोबा जाधव (वय : 72 वर्ष) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Life Imprisonment
Nanded crime: मदनापूर शिवारात हातभट्टीवर पोलिसांचा छापा; ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त

आरोपीविरूद्ध मुक्रमाबाद पो.स्टे. येथे गुरन 171/2024 भारतीय दंड न्यायसंहीता व कलम 4, 6 बालकाचे लैंगिक आत्याचारा पासुन संरक्षण कायदा 2012 अन्वये हा गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण मुखेड न्यायालयात चालले असता 9 साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात साक्षीदाराची साक्ष,वैद्यकीय अहवाल, वैज्ञानिक प्रयोगशाळेचा अहवाल व विशेष सरकारी वकील यांनी केलेला युक्तीवाद, ग्राह्य धरुन पोक्सो न्यायालयाचे विशेष न्यायधिश एस.पी. देशमुख यांनी 14 ऑगस्ट 2026 रोजी आरोपीस दोषी ठरवले.

Life Imprisonment
Nanded drug crime : गांजाप्रकरणी गुजरात पोलिसांनी लोहगावातील एकाला घेतले ताब्‍यात

दरम्यान सुनावणावेळी कलम 4 पोक्सो अँक्ट अन्वये आजन्म कारावासाची शिक्षा व 10,000 दंड तसेच 6 पोक्सो अँक्ट अन्वये आजन्म कारावासाची शिक्षा व 10,000 हजार रु. दंड लावला दंड न भरल्यास पुन्हा एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी अभिवक्ता गाजानन भिकाजी खिल्लारे यांनी काम पाहीले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news