Nanded drug crime : गांजाप्रकरणी गुजरात पोलिसांनी लोहगावातील एकाला घेतले ताब्‍यात

एकूण ६ लाख ६३ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

बिलोली : तालुक्यातील लोहगाव येथील एकाला गुजरातमधील वांसदा पोलिसांनी गांजा प्रकरणात अटक केल्याने बिलोली तालुक्यात खळबळ उडाली आहे. गुजरात पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार वांसदा पोलिसांनी ही कारवाई करीत ६९३ ग्रॅम वनस्पतीजन्य गांजा, मोबाईल फोन आणि कार असा एकूण ६ लाख ६३ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुजरात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑगस्ट रोजी पेट्रोलिंगदरम्यान वांसदा पोलिसांच्या पथकाला संशयास्पद वाहन आढळून आले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये वनस्पतीजन्य गांजा आढळला. या प्रकरणात बिलोली तालुक्‍यातील लोहगाव येथील एकासह अन्य एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी गुजरात पोलिसांनी एन.डी.पी.एस. कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Crime News
Nanded gambling raid : जुगार अड्ड्यावर छापा; ५ जण गजाआड, ३ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

दरम्‍यान, ताब्‍यात घेण्यात आलेला लोहगाव येथील इसम हा गौण खनिज क्षेत्रातील मुरूम व रेती व्यवसायात सक्रिय असल्याची माहिती आहे. त्यामुळे गुजरातमध्ये गांजा प्रकरणात त्याचा सहभाग समोर आल्यानंतर त्याच्या आर्थिक व्यवहारांची, व्यवसायातील भागीदारीची तसेच गुजरातसह इतर राज्यांतील संभाव्य संपर्कांची स्वतंत्रपणे चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे.

विशेषतः या प्रकरणातील गांजा कुठून आणण्यात आला, तो कोणाला पोहोचविला जाणार होता, या व्यवहारामागे आणखी कोण व्यक्ती आहेत, तसेच सदर इसमाचे महाराष्ट्रातील आणि गुजरातमधील कोणकोणाशी आर्थिक अथवा व्यावसायिक संबंध आहेत, याचा तपास होणे गरजेचे असल्याची चर्चा आहे.

Crime News
Hingoli illegal activities : एसपींच्या कठोर भूमिकेने ठाणेदारांचा जागता पहारा
  • गौण खनिज व्यवसायात सक्रिय असलेल्या व्यक्तीचे नाव अमली पदार्थांच्या प्रकरणात समोर आल्याने त्याच्या आर्थिक व्यवहारांची कायदेशीर चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. मात्र, केवळ गांजा प्रकरणातील अटकेच्या आधारावर त्याच्या मुरूम-रेती व्यवसायात कोणतीही गैरप्रकाराची भूमिका होती, असा निष्कर्ष काढता येणार नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी उपलब्ध कागदपत्रे, बँक व्यवहार, वाहनांची ये-जा, व्यावसायिक भागीदारी आणि इतर कायदेशीर बाबी तपासून वस्तुस्थिती स्पष्ट करणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news