Nanded Crime : सिडकोत भाड्याच्या घरातील अनैतिक व्यवसायावर पोलिसांचा छापा!

पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल; अल्पवयीन मुलीसह दोघींची सुटका
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

नवीन नांदेड : सिडकोतील शांतिचौक परिसरात भाड्याच्या घरात महिलांना बोलावून अनैतिक व्यवसाय चालविल्या जात असल्याचा प्रकार पोलिसांच्या छाप्यात उघडकीस आला. या कारवाईत एका अल्पवयीन मुलीसह दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, याप्रकरणी पती-पत्नीविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरून रोख रक्कम, मोबाइल फोन आणि इतर साहित्य असा एकूण ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार शहरातील अनैतिक मानवी व्यापाराविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वजने यांना सिडकोतील शांतिचौक परिसरात आर्थिक फायद्यासाठी महिलांना बोलावून अनैतिक व्यवसाय चालवत असल्याची माहिती मिळाली.

Crime News
Tuljabhavani Temple Darshan : सामान्यांना १२ तास, तर मटकाकिंग थेट गाभाऱ्यात!

या माहितीच्या आधारे १६ ऑक्टोबर रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव आणि महिला पोलीस उपनिरीक्षक अनुपमा कांबळे यांच्या पथकाने सापळा रचला. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खात्री केल्यानंतर पोलिसांनी संबंधित घरावर छापा टाकला.

यावेळी घरातील खोलीत दोन महिला आणि एक अल्पवयीन मुलगी आढळली. पीडित महिलांच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन पैशांचे आमिष दाखवून त्यांना या व्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.

Crime News
Jalna Crime : छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन विद्यार्थिनीने जीवन संपवले
  • याप्रकरणी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा, भारतीय न्याय संहिता आणि बालकांच्या संरक्षणासंबंधी कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक मंगेश नाईक करीत आहेत. नागरिकांना परिसरात अनैतिक मानवी व्यापार किंवा महिलांचे शोषण होत असल्याची माहिती मिळाल्यास नांदेड पोलिसांना अथवा डायल ११२ वर कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news