Crime Nanded | सिडकोत भाड्याच्या घरात अनैतिक व्यवसायाचा पर्दाफाश; अल्पवयीन मुलीसह दोघींची सुटका

पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांचा छापा, ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
Minor children Rescued
Minor RescuedPudhari
Published on: 
Updated on: 

Rented House Racket

नवीन नांदेड : सिडकोतील शांतिचौक परिसरात भाड्याच्या घरात महिलांना बोलावून अनैतिक व्यवसाय चालविल्या जात असल्याचा प्रकार पोलिसांच्या छाप्यात उघडकीस आला. या कारवाईत एका अल्पवयीन मुलीसह दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी पती-पत्नीविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरून रोख रक्कम, मोबाइल फोन आणि इतर साहित्य असा एकूण ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार शहरातील अनैतिक मानवी व्यापाराविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वजने यांना सिडकोतील शांतिचौक परिसरात शोभा रासे आणि तिचा पती शंकर रासे हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना बोलावून अनैतिक व्यवसाय चालवत असल्याची माहिती मिळाली.

Minor children Rescued
Nanded News : रस्‍त्‍याचे काम सुरू तरीही सिमेंटचा लेप देऊन रस्‍त्‍याची दुरुस्ती कशासाठी?

या माहितीच्या आधारे १६ ऑक्टोबर रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव आणि महिला पोलीस उपनिरीक्षक अनुपमा कांबळे यांच्या पथकाने सापळा रचला. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खात्री केल्यानंतर पोलिसांनी संबंधित घरावर छापा टाकला. त्यावेळी शोभा शंकर रासे (वय ४५) आणि शंकर चुडामन रासे (वय ५१) हे दोघे आढळून आले. घरातील खोलीत दोन महिला आणि एक अल्पवयीन मुलगी आढळली. पीडित महिलांच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन पैशांचे आमिष दाखवून त्यांना या व्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.

याप्रकरणी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा (ITPA), भारतीय न्याय संहिता आणि बालकांच्या संरक्षणासंबंधी कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक मंगेश नाईक करीत आहेत.

नागरिकांना परिसरात अनैतिक मानवी व्यापार किंवा महिलांचे शोषण होत असल्याची माहिती मिळाल्यास नांदेड पोलिसांना अथवा डायल ११२ वर कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news