T Raja Singh | चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी आमदार टी. राजासिंह यांच्यावर गुन्हा दाखल

बिलोली येथे श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा आणि धर्मसभेमध्ये दोन समुदायांत तेढ निर्माण होईल, असे प्रक्षोभक भाषण
Nanded police case
T Raja Singh Pudhari
Published on
Updated on

Nanded police case Hyderabad MLA T Raja Singh

बिलोली : बिलोली येथे श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा आणि त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या धर्मसभेमध्ये दोन समुदायांत तेढ निर्माण होईल, असे प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी भाग्यनगर (हैदराबाद) येथील आमदार टी. राजासिंह ठाकूर यांच्यावर बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

४ एप्रिल २०२६ रोजी बिलोली शहरात श्रीराम जन्मोत्सवानिमित्त शोभायात्रा आणि धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने काही अटी व शर्तींनुसार परवानगी दिली होती. बैल बाजार मैदान येथे सायंकाळी ७:०० ते ९:२० या वेळेत ही सभा पार पडली.

Nanded police case
Nanded police commissionerate : पोलिस आयुक्तालयासाठी सुधारित प्रस्ताव सादर!

या सभेला संबोधित करताना टी. राजासिंह यांनी अत्यंत प्रक्षोभक भाषा वापरल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. फिर्यादीनुसार, त्यांनी आपल्या भाषणात विशिष्ट समुदायाबद्दल आक्षेपार्ह शब्दांचा वापर.

"मदरशांमध्ये दहशतवादी कारवाया चालतात" असे विधान करून मदरसा पाडण्याची भाषा. लोकसंख्या वाढ आणि 'लव्ह जिहाद' यांसारख्या विषयांवरून चिथावणीखोर वक्तव्ये. "औरंगजेबाची कबर उखडून तिथे शौचालय बांधले पाहिजे," असे वादग्रस्त विधान करीत न्यायालयाने आणि पोलिसांनी दिलेल्या नोटिशीमधील अटींचा भंग केला आहे.

Nanded police case
Nanded accident | ऑटोरिक्षाला कारची धडक, एक जण जागीच ठार, एक गंभीर जखमी

सभेच्या वेळी बंदोबस्तावर तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक विजय लिंगुराम पंतोजी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, राजासिंह यांच्या भाषणामुळे नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी टी. राजासिंह यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बिलोली पोलीस करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news