Nanded Court News | ११ क्विंटल २७ किलो गांजा वाहतूकप्रकरणी दोघांना १० वर्षांचा सश्रम कारावास

प्रत्येकी एक लाख रुपये दंड; बिलोली अतिरिक्त सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
Nanded Court News | ११ क्विंटल २७ किलो गांजा वाहतूकप्रकरणी दोघांना १० वर्षांचा सश्रम कारावास
Published on: 
Updated on: 

Biloli Additional Sessions Court

बिलोली : तब्बल ११ क्विंटल २७ किलो गांजाची बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी बिलोली येथील जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. हुंडार यांनी दोन आरोपींना दोषी ठरवत प्रत्येकी १० वर्षे सश्रम कारावास आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांचा सश्रम कारावास भोगावा लागणार आहे.

गोकुळ नारायण राजपुत (वय ३२, रा. होणाजीवाडी, ता. पैठण, जि. संभाजीनगर) आणि सुनील यादव महाजन (वय ३५, रा. निजामाता शाळा, इरंडोल, जि. जळगाव) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा १९८५ मधील कलम ८ (क), २० (ब) (२) (क), २५ आणि २९ अन्वये त्यांच्यावरील गुन्हा सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने हा निकाल दिला.

Nanded Court News | ११ क्विंटल २७ किलो गांजा वाहतूकप्रकरणी दोघांना १० वर्षांचा सश्रम कारावास
Nanded crime news: देगाव फाट्यावर देशी दारूची चोरटी वाहतूक उधळली; ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त

या प्रकरणाची सुरुवात १४ नोव्हेंबर २०२१ रोजी झाली. स्वापक नियंत्रण ब्युरोच्या मुंबई विभागातील तत्कालीन विभागीय पोलीस अधिकारी समीर वानखेडे यांना गुप्त बातमीदाराकडून गांजाच्या वाहतुकीची माहिती मिळाली होती. त्यानुसार नायगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गडगा-कन्हाळा मार्गावर मांजरम गावाजवळील महामार्गी बौद्ध विहाराच्या रस्त्यावर पथकाने सापळा रचला.

१५ नोव्हेंबर रोजी पहाटे सुमारे ५.४५ वाजता ट्रक क्रमांक एमएच २६ एडी २१६५ची झडती घेतली असता त्यामध्ये ११ क्विंटल २७ किलो गांजा आढळून आला. विशाखापट्टणम येथून जळगावकडे हा गांजा बेकायदेशीररीत्या वाहतूक केला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी स्वापक नियंत्रण ब्युरोचे वरिष्ठ अधिकारी अमोल मोरे यांच्या फिर्यादीवरून नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Nanded Court News | ११ क्विंटल २७ किलो गांजा वाहतूकप्रकरणी दोघांना १० वर्षांचा सश्रम कारावास
Nanded Crime : नांदेड ग्रामीण पोलिसांची अवैध धंद्यांवर कारवाई

तपास पूर्ण करून तपासी अंमलदार विठ्ठल पवार यांनी दोषारोपपत्र बिलोली अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल केले. खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. साक्षी-पुरावे आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवले.

सरकारतर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. संदीप कुंडलवाडीकर यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. जयेश संदीप अग्रवाल, ॲड. योगेश सतीश पुंड तसेच पैरवी कर्मचारी एच. एन. सुगावे, शेख इम्रान शेख मन्सूर आणि पोलीस हवालदार महेंद्र दासरवार यांनी सहकार्य केले.

या मोठ्या गांजा जप्तीप्रकरणी न्यायालयाने सुनावलेल्या कठोर शिक्षेमुळे अमली पदार्थांच्या अवैध वाहतुकीविरोधात कायद्याची कठोर अंमलबजावणी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news