'तुझ्या नवऱ्याला संपवतो'|पतीला ठार मारण्याची धमकी देत विवाहितेवर बलात्कार

सिंदखेड पोलीसांत गुन्हा दाखल; संशयित आरोपीस अटक
Nanded: Atrocities on married woman by threatening to kill her husband
नांदेड : नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेवर अत्‍याचारFile Photo
Published on
Updated on

वाई बाजार : पुढारी वृत्तसेवा

नव-याला जीवे मारण्याची धमकी देवून विवाहितेवर अत्याचार केल्याची खळबजनक घटना ता. १ जुलै रोजी घडल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी सिंदखेड पोलीस स्‍टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयीत आरोपीस अटक करण्यात आली आहे.

Nanded: Atrocities on married woman by threatening to kill her husband
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या किक बॉक्सिंग शिक्षकाला अटक

माहूर तालुक्यातील सिंदखेड पोलीस ठाण्यात एका (३३ वर्षीय) विवाहितेने सिंदखेड पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार दिली. यामध्ये तीने दिलेल्या जबाबाप्रमाणे दि. १ जुलै २०२४ रोजी रस्‍त्‍याने जात असताना संशयीत आरोपीने तिच्या नव-याला जीवे मारण्याची धमकी दिली. तद्नंतर त्या महिलेला संशयीत आरोपीने त्‍याच्या रस्त्यालगत असलेल्या जुन्या घरी नेवून अत्‍याचार केल्‍याची फिर्याद सदर पीडित विवाहीतेने सिंदखेड पोलीस ठाण्यात दिली आहे.

Nanded: Atrocities on married woman by threatening to kill her husband
Gold Price Today | सोने पुन्हा ७२ हजारांजवळ, चांदीही महागली

दरम्यान विवाहितेच्या तक्रारीवरून सिंदखेड पोलीस ठाण्यात पवन लक्ष्मण गायकवाड (वय २६) ता. माहूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयीत आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले असून प्रकरणाचा तपास सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक आर.बी. जाधवर हे करीत आहेत. विशेष म्हणजे १ जुलैपासून लागू करण्यात आलेल्या भारतीय न्यायसंहितेच्या कायद्यानुसार सिंदखेड पोलीस ठाण्यातील हा पहिलाच गुन्हा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news