विशेष सखोल पुनरीक्षणासाठी आयोगाच्या आदेशाची प्रतीक्षा!

प्रशासन सज्ज : जिल्ह्यातील मतदारांचे ८० टक्के मॅपिंग पूर्ण
voter list
voter listPudhari
Published on
Updated on

Nanded Administration Ready: 80% Mapping of District Voters Completed

नांदेड, पुढारी वृत्तसेवा पूर्व नियोजनानुसार एप्रिल महिन्यांत मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (एस.आर.आर). होणार होते. त्यानुसार प्रशासनाच्या वतीने पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील मतदारांचे ८० टक्के मॅपिंग पूर्ण झाले असून लोहा तालुका यात अग्रेसर आहे. तर नांदेड उत्तर मतदार संघात अद्याप बरेच काम व्हायचे आहे.

एस.आय.आर. अर्थात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम यामुळे देशभरातील मतदार याद्या दोषमुक्त होत आहेत. विहार विधानसभेच्या निवडणुकीत सुमारे ४० लाख मतदार वगळले गेले. सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, पाँडेचेरी आणि तामिळनाडू येथील विधान सभा निवडणुकीसाठीही मोठ्या प्रमाणात बोगस मतदार वगळले गेले.

voter list
६२७ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात झाले बंद

हे आकडे धक्कादायक असून महाराष्ट्रात भारत निर्वाचन आयोग सुद्धा याच महिन्यात एस.आय.आर.ला सुरुवात होणार आहे; परंतु एप्रिलचे दहा दिवस उलटले तरी अद्याप निवडणूक आयोगाचे निर्देश आले नाहीत. दरम्यान, आसाम व अन्य राज्याच्या विधानसभा निवडणुकांसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान २९ एप्रिल रोजी संपणार आहे. त्यामुळे एकतर त्यानंतर किंवा दि. १५ एप्रिलनंतर केव्हाही निवडणूक आयोगाचे निर्देश येऊ शकतात.

एस.आय. आर. पूर्वी मतदार याद्यांतील प्रद्यण अर्थात डेटा मॅपिंग पूर्ण करणे आवश्यक आहे. मॅपिंग अर्थात आजच्या मतदार यादीत मतदाराचे नाव आहे, त्या मतदाराने २००२ मध्ये सुद्धा आपले नाव त्या मतदार यादीत असल्याचा पुरावा सादर करणे. मतदाराचे स्थलांतर झाल्यास वा अन्य कारणामुळे फरक पडल्यास विहित नमुन्यातील अर्ज भरून बी.एल.ओ. अर्थात मतदान केंद्र अधिकाऱ्याकडे द्यायचा, त्यानंतर मॅपिंगची प्रक्रिया पूर्ण होते; परंतु मॅपिंग होऊ न शकलेल्या मतदारांना आयोगाने ठरवून दिलेले विशिष्ट कागदपत्र सादर करावे लागणार आहेत. आयोग ज्यावेळी प्रत्यक्ष एस.आय.आर. चे निर्देश देईल, त्यावेळी कोणते कागदपत्र सादर करावयाचे त्याची यादी जाहीर करेल.

voter list
Jalna civic body voting : 454 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद

नांदेड जिल्ह्यात एकूण २८ लाख २४ हजार २१८ मतदार असून त्यापैकी २२ लाख ४० हजार ६६७ अर्थात ७९.३ टक्के मतदार लिंक झाले आहेत. याबाबतीत सर्वाधिक काम लोहा विधानसभा मतदार संघात झाले असून ३ लाख ४ हजार ९१५ मतदारांपैकी २ लाख ७० हजार ६१६ म्हणजे ८८.७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्या खाल- ोखाल देगलूर विधानसभा मतदार संघात २ लाख ६९ हजार ५२० मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून त्याची टक्केवारी ८६.४६ आहे.

सर्वात निराशाजनक किंवा संथ काम नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघात केवळ ५६.९८ टक्के झाले आहे. इथे एकूण ३ लाख ६५ हजार ४८८ मतदारंपपैकी २ लाख ८ हजार २५२ मतदारांची मॅपिंग प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानंतर नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघात ३ लाख २० हजार ७१५ मतदारांपैकी २ लाख १९ हजार ७३३ मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. हे प्रमाण ६८.५१ टक्के आहे.

किनवट विधानसभा मतदार संघात १२ लाख ८० हजार ५९९ मतदारांपैकी २ लाख ३५ हजार २९८ (८३.८६) मतदार लिंक झाले आहेत. हदगाव मध्ये ३ लाख ५ हजार ३४४ मतदारांपैकी २ लाख ५३ हजार ८१३ (८३.१२), भोकर ३ लाख ९ हजार ४३२ पैकी २ लाख ६२ हजार ३७६ (८४.७९), नायगाव ३ लाख १४ हजार ९१९ पैकी २ लाख ६० हजार ३०९ (८२.६६) तर मुखेड विधानसभा मतदार संघात ३ लाख १२ हजार ३९० मतदारांपैकी २ लाख ६० हजार ७५६ मतदारांचे डेटा मॅपिंग पूर्ण झाले असून त्याची टक्केवारी ८३.४७ भरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news