Nanded Crime News : नांदेड ग्रामीण पोलिसांची सततच्या कारवाईने वाळूमाफियांचे कंबरडे मोडले

महिनाभरात वाळूतस्करांवर ९ वेळा कारवाई
Sand Mafia
Nanded Crime News : नांदेड ग्रामीण पोलिसांची सततच्या कारवाईने वाळूमाफियांचे कंबरडे मोडलेFile Photo
Published on
Updated on

Nanded Action taken against sand smugglers 9 times in a month

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात वाळूमाफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी वाळूमाफियांवर कारवाईची मोहिम तीव्र करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभुमीवर नांदेड ग्रामीण पोलिसांनी वाळूतस्करांवर महिनाभरात सर्वाधिक कारवाई केली. तब्बल नऊ ठिकाणी वाळूतस्करांवर कारवाई करुन साडेपाच कोटींचा मुद्देमाल जप्त करत वाळूमाफियांना चांगलाच दणका दिला आहे.

Sand Mafia
Nanded News : रोहित्र जळण्याचे प्रकार वाढले

नांदेड जिल्हयात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यातच वाळूमाफियांची दादागिरी वाढली आहे. वाळूतस्करींतून शासनाचा महसूल बुडत आहे. सध्या महसूल यंत्रणा वाळूवर कारवाई करताना दिसत नाही मात्र, पोलीस यंत्रणा अॅक्टिव्ह मोडमध्ये आल्याचे एकंदर परिस्थितीवरुन दिसते.

जिल्हयात नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या टिमने एकाच महिण्यात अनुक्रमे दि ६, ११, १३, १५,१७,१६, २२, २३ आणि २८ अशा ९ तब्बल ठिकाणी गोदावरी नदीच्या पात्रातातून अवैधरित्या वाळू उपसा करुन वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा, १५ हायवा, २५ बोटी, १० इंजिन, दीडशेच्यावर तराफे असा साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच जवळपास तीस जणांवर वाळूतस्करी प्रकराणात गुन्हा दाखल केला आहे.

Sand Mafia
Nanded News : शहरातील मोकळ्या जागा मनपा उपयोगात आणणार का ?

सातत्याने वाळूमाफियांवर कारवाई करुन वाळूतस्करीचे मोठे रॅकेट उध्वस्त करण्याचे काम पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व त्यांची टिम करीत आहेत. गेल्या महिनाभरात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदेड शहरासह विष्णुपूरी, काळेश्वर, भनगी, वाहेगाव, पिंपळगाव निमजी, वांगी, इंजेगाव, नागापूर, सिद्धनाथ, पुणेगाव तब्बल १५ ठिकाणी गोदावरी नदीपात्रात ही कारवाई

नांदेड ग्रामीणचे पथक...

नांदेड ग्रामीण पोलीसांनी एका महिण्यात तब्बल ९ वेळा वाळू तस्करांवर १५ ठिकाणी कारवाई करत तब्बल साडेपाच कोटींचा मुद्देमाल जप्त केला यात पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुसमे, पोलीस उपनिरीक्षक भिसे, पोलीस जमादार जाधव, केंद्रे, गवेंद्र सिरमलवार, शेख समीर, चावरे आदींनी ही कामगिरी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news