Nanded Accident |घोटी परिसरात पहाटे गंभीर अपघात ; डॉक्टर बहीण-भावासह तिघे गंभीर जखमी

नागपूर येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू
Nanded Accident
Nanded Accident |घोटी परिसरात पहाटे गंभीर अपघात ; डॉक्टर बहीण-भावासह तिघे गंभीर जखमी
Published on
Updated on

किनवट : चंद्रपूर-किनवट मार्गावर किनवट तालुक्यातील घोटी परिसरात आज शुक्रवारी (दि.06) पहाटे 5 च्या सुमारास झालेल्या भीषण रस्ते अपघातात डॉक्टर बहीण-भाऊ आणि वाहनचालक असे तिघेजण गंभीर जखमी झाले. जखमींवर सध्या नागपूर येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

या अपघातात गोकुंदा येथील ज्येष्ठ आदिवासी नेते नारायण सिडाम यांची नातवंड तसेच माजी सैनिक अशोक आबाराव सिडाम यांची कन्या डॉ. रत्नमाला अशोक सिडाम, त्यांचा मुलगा डॉ. कुणाल अशोक सिडाम आणि वाहनचालक अजय लदाडे हे जखमी झाले आहेत. डॉ. कुणाल सिडाम यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी हे कुटुंबीय गडचिरोली येथे गेले होते. कार्यक्रम आटोपून चंद्रपूर मार्गे किनवटकडे परतत असताना हा अपघात घडला.

घोटी परिसरात पहाटे सुमारे पाचच्या सुमारास अचानक वाहनचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याबाहेर जाऊन जोरात आदळले. अपघाताची तीव्रता इतकी होती की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तिघांनाही गंभीर दुखापती झाल्या. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना प्रथम आदिलाबाद येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून सिडाम कुटुंबावर ओढवलेल्या या संकटाबद्दल सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, संबंधित यंत्रणांनी अपघाताची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news