Nanded Accident | भरधाव आयशरची ऑटोला भीषण धडक; १४ महिला मजुरांसह १६ जण जखमी

7 जणांची प्रकृती गंभीर, हळद काढणीसाठी निघाल्या होत्‍या महिला
Nanded Accident
Nanded Accident | भरधाव आयशरची ऑटोला भीषण धडक; १४ महिला मजुरांसह १६ जण जखमीFile Photo
Published on
Updated on

उमरखेडः उमरखेड–ढाणकी रोडवर एमआयडीसीजवळ शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात भरधाव वेगाने येणाऱ्या आयशरने ऑटोला जोरदार धडक दिल्याने १४ महिला मजुरांसह एकूण १६ जण जखमी झाले. त्यापैकी ७ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उमरखेड परिसरातील शेतात हळद काढणीसाठी महिला मजूर ऑटो (क्र. सीजी ०४ एमटी १२२६) ने जात असताना ढाणकी रोडवरील एमआयडीसीजवळ समोरून येणाऱ्या आयशर (क्र. एमएच ४० बीएल ५१८०) ने प्रथम एका मोटरसायकलला धडक दिली व त्यानंतर समोरून येणाऱ्या ऑटोवर आदळली. धडक इतकी जोरदार होती की ऑटोमधील महिला मजूर जखमी झाल्या.

Nanded Accident
Nanded accident | जंगमवाडी पाटीजवळ भीषण अपघात : एकाचा मृत्यू, तर पाच गंभीर जखमी...

अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना बाहेर काढले. दरम्यान, संतप्त नागरिकांनी आयशर चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या अपघातात मोटरसायकलस्वार लक्ष्मण किशन गायकवाड, बिजाबाई विठ्ठल झुंकेकर (६५), वर्षा सुरेश गायकवाड (३७), लक्ष्मी जयराम दिवेकर (६५), सुनीता मुकेश दिवेकर (३७), रेखा प्रभाकर शिंदे (४०), अर्चना नितीन जगताप (३७) यांच्यासह अन्य महिला मजूर जखमी झाल्या आहेत. सर्व जखमींना उमरखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर नांदेड व यवतमाळ येथील रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक योगेश जाधव व जमादार अमित निळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून आयशर व चालकास ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news