MP Nagesh Patil Ashtikar : ऑपरेशन टायगरच्या निव्वळ वल्गना; मी पक्ष सोडणार नाही

अशी माहिती खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी येथे वार्ताहर बैठकीत दिली.
MP Nagesh Patil Ashtikar
MP Nagesh Patil Ashtikar : ऑपरेशन टायगरच्या निव्वळ वल्गना; मी पक्ष सोडणार नाही file photo
Published on
Updated on

MP Nagesh Patil Ashtikar : 'Operation Tiger' is mere empty talk; I will not leave the party

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे, ऑपरेशन टायगरच्या निव्वळ वल्गना; मी कोणत्याही परिस्थितीत पक्ष सोडणार, अशी माहिती खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी येथे वार्ताहर बैठकीत दिली.

MP Nagesh Patil Ashtikar
Legislative Council Elections | युतीत आवाज कुणाचा?

गेल्या काही दिवसापासून आष्टीकर हे पक्ष सोडणार अशी चर्चा सुरू आहे, या पार्श्वभूमीवर खासदार आष्टीकर यांनी रविवारी एका हॉटेलमध्ये वार्ताहर बैठक घेऊन आपण कुठेही जाणार असल्याचा खुलासा केला. ते म्हणाले, सध्या नांदेड विधान परिषदेची निवडणूक सुरू आहे, या निवडणुकीत माझा मुलगा कृष्णा पाटील रिंगणात आहे, त्यामुळे मी या निवडणुकीत व्यस्त आहे. मला कुठेही जाता येत नाही.

याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांनाही सविस्तर माहिती दिली आहे आणि त्यांनीही मला योग्य मार्गदर्शन केले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे झालेल्या चर्चेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही समाधान झाले आहे, असे आष्टीकर यांनी सांगितले.

MP Nagesh Patil Ashtikar
Nanded Political News : दोन भूमिपुत्रांनंतर नांदेडचे जावई आता राज्यसभेवर!

मी पक्ष सोडणार अशा अफवा मागील दोन वर्षापासून सुरू आहेत. या अफवावर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहनही अष्टेकर यांनी केले. विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया संपल्यानंतर मी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आज झालेल्या बैठकीत ३० उपस्थित होते, जिल्हाप्रमुख बबन बारसे यांनीही बैठकीत सहभाग घेतला होता असे ते म्हणाले.

मतदारांशी संपर्क सुरू

विधान परिषद निवडणुकीसाठी मतदारांशी संपर्क सुरू असून अनेक मतदार बाहेरगावी गेले आहेत. त्यांच्याशी तसेच येथे असलेल्या मतदारांशी चर्चा सुरू असल्याचे आष्टीकरांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news