Nanded News : तरुण कार्यकर्त्यांच्या टीकाटिप्पणीमुळे खा. अशोक चव्हाण अस्वस्थ !

भाजपाच्या सभेतून दिले उत्तर : विरोधकांचे कारस्थान हाणून पाडण्याचे आवाहन
nanded news
तरुण कार्यकर्त्यांच्या टीकाटिप्पणीमुळे खा. अशोक चव्हाण अस्वस्थ !file photo
Published on: 
Updated on: 

MP Ashok Chavan unsettled by criticism from young party workers

संजीव कुळकर्णी

नांदेड : दुष्काळ, शेतकऱ्यांना मदत, एसआयआर मोहीम तसेच उसाचा दर आदी मुद्यांवर खा. अशोक चव्हाण यांना भोकर मतदारसंघातील काँग्रेस व अन्य संघटनेच्या तरुण कार्यकत्यांनी मागील काही दिवसांत लक्ष्य केल्यामुळे चव्हाण अस्वस्थ झाले आहेत. शनिवारी भाजपाच्या वतीने येथे झालेल्या सभेमध्ये त्यांनी आपली खदखद व्यक्त केली.

nanded news
Eknath Shinde : दुष्काळाच्या छाताडावर पाय रोवून पुढे जाण्याची गरज

भोकर विधानसभेचे प्रतिनिधित्व चव्हाण यांच्या कन्येकडे आहे; पण विरोधकांच्या टीकेला जशास तसे उत्तर देण्याची प्रगल्भता त्यांच्याकडे अद्याप आलेली नाही. या मतदारसंघाच्या प्रारूप मतदार यादीतील त्यांच्या नावास बास्डच्या संदीपकुमार देशमुख यांनी घेतलेला आक्षेप प्रशासकीय पातळीवर अद्याप प्रलंबित आहे. त्याची बाहेर बरीच चर्चा झाल्यानंतर आपल्या कन्येचे नाव भोकर मतदारसंघातून नांदेड उत्तर मतदारसंघात नोंदविण्याची प्रक्रिया केल्याचे चव्हाण यांना स्पष्ट करावे लागले; पण आक्षेप व त्याच्या चर्चेमुळे चव्हाण झाल्याचे निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

विशेष दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत मुदखेडचा समावेश झाला नव्हता. त्यावरून तसेच भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या दरावरून काँग्रेसचे बालाजी गाडे यांनी अलीकडे चव्हाण यांना लक्ष्य केले होते. शेतकरी संघटनेच्या हनुमंत राजेगोरे यांनी चव्हाणांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींवरून समाजमाध्यमांद्वारे टीका केली. जाहिरातींतून मिळालेले उत्पन्न दुष्काळग्रस्तांसाठी देणार का, असा सवाल त्यांनी जाहीरपणे केला होता.

काँग्रेस पक्षातील मोठे नेते-पदाधिकारी अशोक चव्हाण यांच्या बाबतीत 'मवाळ मौनी' झाल्याचे दिसत असताना भोकर मतदारसंघातील काही तरुणांनी मात्र चव्हाण यांची कोंडी करण्याचा प्रयत्न जोरकसपणे केला. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वतीने शनिवारी येथे झालेल्या कार्यक्रमात चव्हाणांची अस्वस्थता ठळक झाल्याचे दिसले, तांत्रिक कारणांमुळे दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या पहिल्या यादीत मुदखेडचे नाव आले नव्हते. आता ते जाहीर झाले आहे, याकडे लक्ष वेधत विरोधकांकडून दुष्काळाचे राजकारण केले जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.

nanded news
Farmer Protest Nanded | क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लोह्यात श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्सचे कार्यालय फोडले

बालाजी गाडे यांनी गेल्या आठवडचात भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या हंगामातील ऊस दर जाहीर करावा, या मागणीवरून आक्रमक पवित्रा घेतला होता. भोकर मतदारसंघातील राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याची बाब समोर आणतानाच भाजपा सरकारची कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप गाडे यांनी केला, त्याची समाजमाध्यमांतून व्यापक प्रसिद्धीही झाली.

हे सर्व काही पुढील निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन होत आहे, असे चव्हाण यांनी वरील समेत नमूद केले. त्याचवेळी 'तुला तिकीट मिळणार का रे बाबा', असा सवाल त्यांनी गाडे यांना उद्देशून केला. याच सभेत त्यांनी एसआयआर मोहीम, दुष्काळ आदी मुद्यांवरून विरोधकांचा समाचार घेतानाच या विरोधकांच्या बाबतीत गुपचूप बसाल तर फसाल, असा इशारा भाजपा कार्यकर्त्यांना दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.