Farmer Protest Nanded | क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लोह्यात श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्सचे कार्यालय फोडले

दुष्काळात सक्तीच्या वसुलीविरोधात आक्रमक पवित्रा
Loha Finance Office Attack
Loha Finance Office AttackPudhari
Published on: 
Updated on: 

Loha Finance Office Attack

लोहा : “दुष्काळात शेतकऱ्यांच्या दारात जाऊन जबरदस्ती वसुली कराल, महिलांना त्रास द्याल, तर एकही फायनान्स कंपनीचे कार्यालय शिल्लक ठेवणार नाही,” असा आक्रमक इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला होता. आता या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर लोहा शहरात रयत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव व कार्यकर्त्यांनी दोन खासगी फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. श्रीराम फायनान्स आणि बजाज फायनान्स या कंपन्यांच्या कार्यालयांना लक्ष्य करण्यात आल्याने लोहा शहरात एकच खळबळ उडाली आहे.

लोहा शहरातील नांदेड, लातूर रोडवर असलेल्या आफिसवर रयत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खाजगी फायनान्स कंपनी वाले शेतकऱ्यांना वसुलीसाठी दगादा लावत असल्यामुळे दुपारी एकच्या दरम्यान हल्ला करून तोडफोड केली आहे .राज्यात दुष्काळाने शेतकरी, शेतमजूर आणि भूमिहीन कुटुंबांचे जगणे कठीण झाले असताना मायक्रोफायनान्स आणि खासगी फायनान्स कंपन्यांकडून सक्तीची वसुली सुरू असल्याचा गंभीर आरोप रविकांत तुपकर यांनी यापूर्वी केला होता.

Loha Finance Office Attack
Nanded News : सगरोळीत वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करताना तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

“वसुलीवाल्यांनो, शेतकऱ्यांच्या दारात याल, महिलांना त्रास द्याल, तर कपडे काढून फटके देऊ! सरकारने वेळीच आवरावे, अन्यथा जोरजबरदस्तीने वसुली करणाऱ्या कंपन्यांचे एकही कार्यालय शिल्लक ठेवणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला होता.

दरम्यान, आज,२ नोव्हेंबरला लोह्यात रयत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दोन फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांची तोडफोड केल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे क्रांतिकारी शेतकरी संघटना व मायक्रो फायनान्स कंपन्या समोरासमोर येणार आणि राज्यात आंदोलन पेटणार असल्याचा इशारा नेत्यांनी दिला आहे.तुपकरांनी यापूर्वी दिलेल्या इशाऱ्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.