11th admission 2026 : मिशन ॲडमिशन : अकरावी प्रवेशाचा बिगुल वाजला

19 मे रोजी पहिली गुणवत्ता यादी; पाच टप्प्यांत राबवणार ऑनलाइन प्रक्रिया
11th admission 2026
11th admission 2026pudhari photo
Published on
Updated on

नांदेड ः इयत्ता दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपल्यानंतर आता विद्यार्थ्यांचे लक्ष उच्च माध्यमिक शिक्षणाकडे लागले आहे. जिल्ह्याचा निकाल 83.62 टक्के लागल्याने हजारो विद्यार्थ्यांच्या पुढच्या प्रवासाचा मार्ग मोकळा झाला असून, अकरावी प्रवेश प्रक्रियेला आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे. सोमवार (दि. 11) पासून अर्जाचा पहिला भाग भरण्यास सुरुवात होत असून, ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडणार आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत नांदेड जिल्ह्यातून 47 हजार 333 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 39 हजार 580 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात मुलींनी बाजी मारली असून 20 हजार 162 विद्यार्थिनी, तर 19 हजार 419 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत निकाल 8.31 टक्क्यांनी घसरल्याने यंदा प्रवेशासाठी फारशी चढाओढ न होता ही प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडण्याची शक्यता आहे.

11th admission 2026
Polytechnic admissions | पॉलिटेक्निक : कॉम्प्युटर, मेकॅनिकलला सर्वाधिक प्रवेश

अशी असेल प्रवेशाची नियमावली

विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी :हीींंीि://ारहरषूक्षलरवाळीीळेपी.ळर्पें (हीींंीि://ारहरषूक्षलरवाळीीळेपी.ळप) या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. ही प्रक्रिया एकूण पाच टप्प्यांत राबवली जाणार आहे. यामध्ये तीन नियमित फेऱ्या, चौथी फेरी ओपन टू ऑल आणि पाचवी फेरी विशेषतः मुलींसाठी राखीव असेल.

प्रवेश प्रक्रियेचे महत्त्वाचे टप्पे :

11 ते 13 मे : शैक्षणिक पात्रतेची माहिती भरून अर्जाचा भाग 1 सादर करणे.

15 मे : तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल.

18 मे : अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.

19 मे : इन-हाऊस, व्यवस्थापन आणि अल्पसंख्याक कोट्यासाठी झिरो राऊंडचे वाटप.

21 ते 22 मे : नवीन नोंदणी व अर्जात बदल करण्याची संधी.

23 ते 26 मे : महाविद्यालयांचे पसंतीक्रम (जीिंळेप ऋेीा ) भरणे.

26 ते 28 मे : प्रत्यक्ष प्रवेश निश्चिती.

30 मे : दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर होणार.

ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन

विद्यार्थ्यांनी पोर्टलवरील सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करूनच अर्ज भरावेत. तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी वेळेत नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news