Nanded Crime : अवैध देशी दारूसह कार जप्त; मरखेल पोलिसांची कारवाई

२ लाख २३ हजार ४० रुपयांच्या मुद्देमालासह एका आरोपीला अटक
Nanded Crime News
अवैध देशी दारूसह कार जप्त; मरखेल पोलिसांची कारवाईpudhari photo
Published on
Updated on

नांदेड : जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत मरखेल पोलिसांना मोठे यश आले आहे. माळेगाव ते करडखेड फाटामार्गे शिवणी फाटा परिसरात पोलिसांनी सापळा रचून २ लाख २३ हजार ४० रुपयांच्या मुद्देमालासह एका आरोपीला अटक केली. बालाजी मलकागौड खुनेवाड (वय ५०, रा. करडखेड, ता. देगलूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मरखेल पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विलास पवार आणि त्यांचे पथक १३ जुलै रोजी रात्री गस्तीवर होते. या वेळी एका टाटा इंडिगो कारमधून (एमएच १४ एफसी ३२९९) अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार रात्री साडेअकराच्या सुमारास संशयित कार अडवून पंचांसमक्ष तपासणी केली असता, डिक्कीत ६ बॉक्समध्ये लपवलेल्या 'भिंगरी संत्रा' ब्रँडच्या देशी दारूच्या २८८ बाटल्या आढळून आल्या.

Nanded Crime News
Sindhudurg News : गोवा दारूची चक्क डंपरमधून वाहतूक

या कारवाईत २३ हजार ४० रुपयांची दारू आणि २ लाखांची कार असा एकूण २ लाख २३ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध मरखेल पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Nanded Crime News
Pathardi Illegal Liquor Raid: पाथर्डीत अवैध हातभट्टीवर मोठी कारवाई; 1 लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news