Vimaleshwar Mahadev Temple : श्री विमलेश्वर महादेव मंदिर मरळक येथे मराठवाड्यातील पहिले ३६ फूट उंच त्रिशूल

श्रावण मासाच्या पावन पर्वाचे औचित्य साधून मरळक येथील श्री विमलेश्वर महादेव मंदिर परिसरात तब्बल ३६ फूट उंच भव्य त्रिशूलाची स्थापना करण्यात येणार आहे.
Vimaleshwar Mahadev Temple
Vimaleshwar Mahadev Temple : श्री विमलेश्वर महादेव मंदिर मरळक येथे मराठवाड्यातील पहिले ३६ फूट उंच त्रिशूलfile photo
Published on
Updated on

Marathwada's first 36 feet tall trishul at Shree Vimaleshwar Mahadev Temple Maralak

नांदेड, पुढारी वृत्तसेवा श्रावण मासाच्या पावन पर्वाचे औचित्य साधून मरळक येथील श्री विमलेश्वर महादेव मंदिर परिसरात तब्बल ३६ फूट उंच भव्य त्रिशूलाची स्थापना करण्यात येणार आहे. सोमवार, दि. २४ ऑगस्ट २६ रोजी सकाळी १० वाजता हा भव्य धार्मिक सोहळा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होणार आहे. या सोहळ्या निमित्त मंदिर परिसरात विविध धार्मिक विधी, पूजाअर्चा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

Vimaleshwar Mahadev Temple
Nanded Rain Update : काळेकुट्ट आभाळ अन् तीन मिनिटाचा पाऊस..

श्रावण महिना हा भगवान महादेवाच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण मानला जातो. या महिन्यात शिवभक्तांकडून उपवास, अभिषेक, रुद्राभिषेक, बेलपत्र अर्पण, महामृत्युंजय जप यांसह विविध धार्मिक उपक्रम श्रद्धेने केले जातात. अशा या पवित्र श्रावण मासात श्री विमलेश्वर महादेवाच्या चरणी ३६ फूट उंच त्रिशूलाची स्थापना होत असल्याने मरळक आणि परिसरातील शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Vimaleshwar Mahadev Temple
Nanded News : नांदेडच्या पालकमंत्र्यांना हटवा; सेनेच्या शहरप्रमुखांची मागणी !

श्रद्धा, भक्ती आणिअध्यात्माचा अनोखा संगम या कार्यक्रमात दिसणार आहे. भगवान शिवाचे प्रमुख आयुध आणि त्यांच्या सामर्थ्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या त्रिशूलाला हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्त्व आहे. या भव्य त्रिशूल स्थापना सोहळ्याचे आयोजन अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांमधून समाजात एकोपा, श्रद्धा आणि संस्कृतीची जपणूक करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news