Nanded Crime | नांदेड : बॅंक सोने अपहार प्रकरणातील मुख्य आरोपीचा राजस्थानात मृत्यू

पोलिस तपासाला मोठे आव्‍हान : डॉक्टर लेन शाखेतील ८५ लाखांचा घोटाळा; सेनगावकरच्‍या निधनाला पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांचा दुजोरा
Nanded SBI Gold Scam
मृत आदित्य सेनगावकरpudhari photo
Published on
Updated on

नांदेड : शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डॉक्टर लेन शाखेतील बहुचर्चित ८५ लाख ८१ हजार रुपयांच्या सोने अपहार प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि बँकेचा रोकड व्यवस्थापक आदित्य प्रकाश सेनगावकर (वय ४०) याचा राजस्थानमधील भरतपूर येथील एका रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

तो गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना चकमा देऊन फरार होता. त्याच्या खिशातील बँकेच्या ओळखपत्रावरून त्याची ओळख पटली असून, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. माहिती मिळताच शनिवारी (दि.१३) सेनगावकरचे कुटुंबीय राजस्थानमधील भरतपूरकडे रवाना झाले आहेत. मुख्य आरोपीच्या मृत्यूमुळे पुढील तपासाचे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

Nanded SBI Gold Scam
‌Nanded Bank Fraud : ‘एसबीआय‌’ अधिकाऱ्यांचा गहाण सोन्यावर डल्ला!

'स्टेट बँक ऑफ इंडिया'च्या शाखेत ८ ग्राहकांनी आपले ८०५.९० ग्रॅम सोन्याचे दागिने गहाण ठेवून कर्ज घेतले होते. हे सोने बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी रोकड व्यवस्थापक आदित्य सेनगावकर आणि सेवा व्यवस्थापक जीवन जगदाळे यांच्यावर होती. ​परंतु, या दोघांनी संगनमत करून २७ जून २०२५ ते ११ मे २०२६ या कालावधीत ग्राहकांच्या खऱ्या सोन्यावर डल्ला मारला. त्यांनी मूळ सोन्यापैकी ३९१.६० ग्रॅम खरे सोने काढून घेतले आणि त्या जागी हुबेहूब दिसणारे ४१४.३० ग्रॅम वजनाचे बनावट सोने आणून ठेवले. बँकेच्या अंतर्गत लेखापरीक्षणात (ऑडिट) हा भांडाफोड झाला.

Nanded SBI Gold Scam
Gadchiroli Fake Currency | शंभर रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या इंजिनिअर सख्ख्या भावांसह चौघांना अटक

चार आरोपी गजाआड; काही सोने जप्त

​या प्रकरणात वजिराबाद पोलिसांनी मोठी कारवाई करत बँकेचा सेवा व्यवस्थापक जीवन जगदाळे याच्यासह इतर चार जणांना यापूर्वीच अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींकडून पोलिसांनी अपहार केलेले काही सोने देखील जप्त केले आहे. हे चारही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

तपासाचे चक्र फिरतेच राहणार!

या घोटाळ्यात मृत आदित्य सेनगावकर याच्यासह आणखीही काही संशयित आरोपींचा समावेश असल्याची माहिती वजिराबाद पोलिसांनी दिली आहे. मात्र, मुख्य सूत्रधार सेनगावकर याचाच मृत्यू झाल्याने, सोने नेमके कुठे गहाण ठेवले किंवा विकले? आणि या रॅकेटमध्ये बँकेतील आणखी कोणाचा हात आहे का? याचा छडा लावणे पोलिसांसाठी कठीण बनले आहे. वजीराबाद पोलीस आता या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी इतर आरोपींची कसून चौकशी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news